Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांना शुद्धलेखणा पासून शुद्ध वागण्या पर्यंतचे सर्व शिक्षण देणे गरजेचे- खासदार मेधा कुलकर्णी

पुणे  : “छडी लागे छम छम ची भाषा जरी आपल्याला आता करता येत नसली तरी चुकांना चूक म्हटल्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये दुरुस्ती कशी येईल? शुद्धलेखणा पासून शुद्ध वागण्यापर्यात सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात त्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. देश कधी मागे राहत नसतो तर देशाचा माणूस मागे राहिला तर देशाचा विकास मंदावतो. त्यामुळे देशाला पुढे न्यायचा असेल तर शाळेमधील विद्यार्थ्यांच्या कृतीला, प्रयोगाला पुढे नेणे हे शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन संसद सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात सण १९२३ साली स्थापन झालेली विद्या प्रसारणी सभा शंभराव्या वर्षात वाटचाल करत असून संस्थेचा शताब्दी महोत्सव वर्षभर साजरा केला गेला. याच शताब्दी महोत्सवचा सांगता समारंभ मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी, भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालय, शिवाजी नगर, येथे आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. वा.मा. औटी (अध्यक्ष- विद्या प्रसारिणी सभा), पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुरेखा जाधव (नगराध्यक्ष लोणावळा नगरपरिषद), संस्थेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, डॉ. सतीश गवळी (कार्यवाह- विद्या प्रसारिणी सभा), सहकार्यवाहक विजय भुरके, शताब्दी महोत्सव प्रमुख डॉ. हिरेन निरगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने शताब्दी महोत्सवानिम्मित वर्षभरात शंभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सांगता समारंभाचे औचित्य साधुन ज्येष्ठ अस्तिरोगतज्ञ, पद्मभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांना वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. सोबतच सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे विजयजी कुकरेजा यांचादेखील गौरव करण्यात आला. संस्थेचे माजी विद्यार्थी सी. डी. दे व माधवराव भोंडे तसेच माजी शिक्षक रमेश वैद्य, सुनंदा कुलकर्णी, लता भोलाप, पूजा भुरके यांचा देखील विशेष सत्कार तर संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शाळांमध्ये देशाचा इतिहास, देशाचा वर्तमान आणि देशाचे भविष्य घडतं. भारताचे उज्वल भविष्य कुठे पहायचं असेल तर ते या वर्ग खोल्यांमध्ये दिसेल. हेच भविष्य घडवण्याचे काम विद्या प्रसारिणी सभेने गेले शंभर वर्ष केले आणि पुढील शंभर वर्ष देखील करेल. त्यासाठी शासन, प्रशासन व सरकार स्तरावरील काही सहकार्य लागत असेल तर त्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्र-कुलगुरु पराग काळकर म्हणले, पूर्वी महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ह्या इमारतीवर गणल्या जायच्या. मात्र आता भिंतीच्या पलीकडे जाणारे आणि माणूस घडवणार शिक्षण गरजेचे आहे. क्वांटिटी पेक्षा कॉलिटी महत्त्वाची आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा विद्यार्थी हाच त्याचा ब्रँड असतो. त्यामुळे आम्ही किती विद्यार्थ्यांना शिक्षण दिले त्यापेक्षा कोणत्या आणि कशा विद्यार्थ्यांना आपण घडवले हे जास्त महत्वाचे येणाऱ्या काळात असेल. असे म्हणत विद्या प्रसारिणी सभेच्या शताब्दी वर्षपूर्तीला काळकर यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. वा.मा. औटी व नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केली.

सदर सोहळ्यासाठी नियम मंडळाचे संदीप अग्रवाल, भगवान आंबेकर, अरविंद मेहता, दिलीपकुमार सराफ, कन्हैया भुरट, प्रमोद कुदळे, केशव कुलकर्णी, धनंजय काळे यांचे देखील विशेष सहकार्य होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक डॉ. सतीश गवळी यांनी केले, सूत्रसंचलन पूजा भुरके व मकरंद खिरे यांनी तर आभार कन्हैया भुरट यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading