fbpx
Wednesday, June 26, 2024
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

वडिलांच्या आठवणींनी रितेश देशमुखला व्यासपीठावरच रडू कोसळले

लातूर : विलास सहकारी साखर कारखाना, लातूर येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले. या प्रसंगी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  असे अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख (Vilasrao Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. भावना व्यक्त करताना रितेश देशमुखला (Ritesh Deshmukh) रडू कोसळलं आणि रितेश मंचावरच हुंदके देत रडू लागला.  त्यांच्या भाषणाने व्यासपीठावर उपस्थित रितेश ची आई व विलासराव देशमुख यांच्या पत्नीला देखील रडू कोसळले. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावरले.

यावेळी रितेशने वडील विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच काका, भाऊ म्हणून त्यांचे देशमुख कुटूंबीयांशी कसे नाते आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भावूक भाषणाने कार्यक्रमाला उपस्थितीत सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील link वर click करा 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading