पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली; अमितेश कुमार नवे पोलीस आयुक्त
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar, IPS)यांची गृहखात्याकडून (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमितेश कुमार (Amitesh Kumar, IPS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त अंकित गोयल (Pune Rural SP Ankit Goel, IPS) यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पंकज देशमुख (Pankaj Deshmukh, IPS) नवे पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त असणार आहेत. अंकित गोयल यांना पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
