Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

‘शांतिदूत सेवा रत्न’ आणि ‘शांतिदूत सेवा गौरव’ पुरस्काराचे वितरण

पुणे  : चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले विचार, चांगले संस्कार तरुण पिढी पर्यात पोहचले पाहिजे. चांगले काम करणाऱ्या व्यक्तींमुळेच समाज सुधारतो. हाच राष्ट्र निर्मितीची भक्कम आधार आहे. चांगल काम करणारे मंडळी समाजात वाढत आहे ही गोष्ट देखील अभिमानाची आहे. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून हे पुरस्कार आहे. अश्या भावना विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव (से. नि.) यांनी व्यक्त केल्या.

शांतिदूत परिवारा तर्फे आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. विठ्ठल जाधव बोलत होते. पुरस्कार सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यावेळी आयकर आयुक्त अभिनय कुंभार (IRS), उद्योजक लेखक व प्रेरणादायी व्याख्याते शरद तांदळे, उद्योजक किसन भोसले, मेघराज राजेभोसले (अध्यक्ष चित्रपट महामंडळ), कर्नल सचिन रंदाळे (शौर्य चक्र व सेना मेडल), डॉ . अभिजीत सोनवणे, शांतीदुत’च्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव व तृषाली जाधव उपस्थित होते.

एल.ओ.सी. हॉस्पिटल, सदाशिव पेठ येथे संपन्न झालेल्या यंदाच्या पुरस्कारांमध्ये ‘शांतिदूत सेवा रत्न पुरस्काराने किसन भोसले (उद्योजक), मेघराज राजेभोसले (अध्यक्ष चित्रपट महामंडळ), अन्वर कुरेशी (गायक, गझलकर), कर्नल सचिन रंदाळे, जगन्नाथ लडकत (अध्यक्ष समर्थ परिवार, पुणे), बबनराव पोतदार (साहित्यीक), शहाजी पाटील अप्पर पोलीस अधिक्षक (से.नि), सत्यजित चौधरी (सामाजिक सेवा), डॉ. मिलिंद भोई (सामाजिक सेवा), म. भा. चव्हाण (गझलकार), हर्षल गोंड पाटील (उद्योजक), देवा तांबे (सामाजिक सेवा), विजय जगताप (ज्येष्ठ पत्रकार) यांना तर ‘शांतिदूत सेवा गौरव २०२४’ पुरस्काराने सामाजिक सेवा करणारे विकास शिंदे, हर्षद पाटील, लेशपाल जवळगे, तुषार कांबळे, अप्पा घोरपडे, विक्रांत धोत्रे व वीरेंद्र कुमार गोडारा यांना गौरण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर तर मोनिका भोजकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी उद्योजक किसनजी भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांची शांतिदूत परिवार कोकण विभाग पदी नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील मनोगते व्यक्त केली.

शांतिदूत परिवाराचे ट्रस्टी सौ प्रमिलाताई शिरसागर, राहुल कराळे, पदाधिकारी व्यंकटसाई चलासनी (आंतरराष्ट्रीय सल्लागार), डॉ. मधुसूदन घाणेकर (आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष) तृषालीताई जाधव (राष्ट्रीय अध्यक्षा), विजय ठुबे (राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतिदूत परिवार), पी.एस साळुंके (अध्यक्ष प. महा.), मोनिका भोजकर (महिला विभाग), सुरेश सकपाळ (सचिव महाराष्ट्र), डॉ.प्रिती काळे (सल्लागार), शीतल शेखे (सरचिटणीस) सौ.विजया नागटिळक (अध्यक्ष पिंपरी चिंचवड) अकबर मेमन, तानाजी भोसले, मधु चौधरी, महेश पाटील, सौ. गीता शाह, डॉ.सोनाली, सर्व डॉक्टर्स व स्टाफ, अक्षय ब्लड बँक टीम आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading