Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

फर्ग्युसन महाविद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात

पुणे : व्यक्ती आणि अभिव्यक्तीचा अनोखा मिलाफ असणाऱ्या मुक्तछंद या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला.

विविध क्षेत्रातील दीडशे होऊन अधिक मान्यवर या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते. गायक महेश काळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ज्युनिअर, विभावरी देशपांडे, चैतन्य वाडेकर, कवी चैतन्य आगरखेडकर, नीलिमा भालेराव, वसंत वाघ, डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गाणी सादर केली. किमया मध्ये विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीजवळ माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. कविता, गोष्टी, एकपात्री प्रयोग सादर केले.

सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद कांबळे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उप प्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सुशील धनमने उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading