Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

यशस्वी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त संस्थेचे सोर्सिंग मॅनेजर नितीन थेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी संस्थेच्या संचालिका शोभा कुलकर्णी,आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे,संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी, दिनेश शर्मा, अमृता तेंडुलकर, मानसी कुदळे,पवन शर्मा, ऍड.अभिलाषा कुलकर्णी, योगेश रांगणेकर आदींच्या उपस्थितीत ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता तेंडुलकर यांनी तर आभार प्रदर्शन आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.याप्रसंगी संस्थेच्या देशभरातील सर्व विभागांमधून आलेले विभागप्रमुख, प्राध्यापक, अन्य कर्मचारी यांच्यासह आयआयएमएसच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading