Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी  :  जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
           कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पै. सुमित भोसले, माजी महापौर माई ढोरे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
          विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या बालनाट्य स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केलेल्या ‘जाईच्या कळ्या’ हे नाटक सादर केले. तसेच समूहगीत, देशभक्तीपर गीत, भाषण सादर केले. संस्थेच्या N.C.C.पथकाची रुबाबदार परेड सांगवीकरांसाठी कौतुकाचा विषय ठरली.
 माई ढोरे यांनी संविधानाचे महत्त्व सांगत नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. अतुल शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. पै. सुमित भोसले यांनी परिस्थितीवर मात करून देखील उत्तुंग यश मिळवता येते, याविषयी मार्गदर्शन केले. आरती राव म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रणव राव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका मोनिका रामस्वामी, प्रिती पाटील, कविता मुदलियार, दर्शना बारी, देबजानी मुजुमदार, तसेच भटू शिंदे, उदय फडतरे व अक्षय नाईक यांनी केले.
सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती गाडे यांनी, तर  अश्विनी वाघमारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading