अमरदीप घोडके, जेसन मल्होत्रा, अमितकुमार सिन्हा, पिनाक अनाप, रोहन साकळकर यांची विजयी कामगिरी !
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत क्यु क्लबच्या अॅलेक्स् रेगो याने मुंबईच्या महेश जगदाळे याचा ४०(२८)-१०, ५३-१७ असा सहज पराभव केला. अॅलेक्स् याने आपल्या विजयामध्ये पहिल्या फ्रेममध्ये २८ गुणांचा बे्रकही नोंदविला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात जेसन मल्होत्रा याने विवेक एसएम याचा ४४-१९, ३७-४७, ३३-२४ असा पराभव केला. अमितकुमार सिन्हा याने सुमित घडीयाली याचा ३७-४६, ५५-१५, ५०-४७ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. पिनाक अनाप याने औरंगाबादच्या रोहीत रावत याचा ३७-०४, ५६-०८ असा सहज पराभव केला.
अमरदीप घोडके याने सलग दोन विजय मिळवले. पहिल्या सामन्यात अमरदीप याने सुदर्शन शिवराम याचा ६९-१७, ७०-२८ असा पराभव केला. त्यानंतरच्या सामन्यात अमरदीपने गौरव वाडे याचा ४४-०९, ९९-२६ असा पराभव करून आगेकूच केली. मुंबईच्या महेश जगदाळे याने पुण्याच्या प्रशांत पवार याचा ४३-२४, ८८-०९ असा सहज पराभव केला. रोहन साकळकर याने सुकील व्ही. याचा ४८-०९, ७२-६२ असा पराभव करत विजयी कामगिरी केली.
सामन्यांचे सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
प्रशांत पवार वि.वि. गुरूनाथ कांबळे ३८-२०, ५८-२३;
जेसन मल्होत्रा वि.वि. विवेक एसएम ४४-१९, ३७-४७, ३३-२४;
अभिजीत मोरे वि.वि. हसन सय्यद ३८-२३, ५६-५०;
सोनु मातंग वि.वि. सुकील व्हि. ४४-१६, ६०-१३;
अमितकुमार सिन्हा वि.वि. सुमित घडीयाली ३७-४६, ५५-१५, ५०-४७;
अमरदीप घोडके वि.वि. सुदर्शन शिवराम ६९-१७, ७०-२८;
पिनाक अनाप वि.वि. रोहीत रावत ३७-०४, ५६-०८;
अमरदीप घोडके वि.वि. गौरव वाडे ४४-०९, ९९-२६;
सतिश कराड वि.वि. सुदीन एम. ३७-१२, ७५-४३;
शोएब गेऊर वि.वि. कार्तिक दिवेदी २९-२१, ७०-३९;
महेश जगदाळे वि.वि. प्रशांत पवार ४३-२४, ८८-०९;
रोहन साकळकर वि.वि. सुकील व्ही. ४८-०९, ७२-६२;
अॅलेक्स् रेगो वि.वि. महेश जगदाळे ४०(२८)-१०, ५३-१७;
