Sunday, October 4, 2026
ENTERTAINMENTLatest News

’काव्यांजली’ मालिकेत काव्याचा नवा लुक..

कलर्स मराठीवरील‘काव्यांजली – सखी सावली’ ही मालिका खूप कमी वेळेत लोकप्रिय ठरली असून या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. काव्या आणि अंजली या दोन बहिणींची कहाणी सर्वांना खूपच आवडतेय. काव्या एक गृहिणी, आई, बहीण, सून, पत्नी अश्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिने नेहमीच येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच विश्वजीतने केलेल्या विश्वासघातामुळे मिनाक्षी म्हणजेच काव्याच्या सासूने त्याला घराबाहेर काढले असूनही मिनाक्षीचा हॉस्पिटलचा सगळा खर्च विश्वजीतनेच केला हे श्रेष्ठा काव्याला सांगते, काव्या व मिनाक्षी ह्यांना हे कळल्यावर त्यांचा संताप होतो. काव्या ने कुठल्याही बाबतीत आता विश्वजीत वर निर्भर राहू नये म्हणून सासू सासरे काव्याला खंबीरपणे आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित करतात. त्या साठी काव्या प्रयत्नही करते पण तिला यश मिळत नाही. ह्याने तिचा आत्मविश्वास कमी होतो. तेव्हा सासू तिला धीर देतात आणि आता तिला बदलण्याची गरज आहे असं सांगते. आजच्या विचारांची सासू – मीनाक्षी, हिच्या सल्ल्यानुसार काव्या मध्ये बदल घडतो जो प्रेक्षकांना २८ जानेवारी च्या भागात पाहायला मिळणार. प्रेक्षकांना त्यांची लाडकी काव्या एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. काव्या स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. या नव्या प्रवासात मिनाक्षी आणि निरंजन – सासू सासरे म्हणून खंबीरपणे कव्याच्या पाठीशी उभे राहणार आहेत. काव्याचा नवा लुक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तिचा हा नवा लुक मालिकेत कोणते नवे वळण घेऊन येणार? हे पाहण्यासाठी नक्की बघा, ’काव्यांजली – सखी सावली’, महारविवार, २८ जानेवारी, दु. २.०० वा. आणि संध्या. ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading