Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आजोबांचे आशीर्वाद घेऊन रोहित पवार ED कार्यालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेस चे युवा आमदार  आमदार रोहित पवार आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ईडी कार्यालायत दाखल झाले आहेत. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. दरम्यान सुळे यांनी ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांना सोडले.  खासदार सुप्रिया सुळे यांनी चौकशीला जाण्याआधी रोहित पवार यांच्या हाती भारतीय संविधान दिले.  तर रोहित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. (Rohit Pawar entered ED office with grandfather’s blessings)

ईडीच्या चौकशीला जाण्यासाठी सकाळी पावणे दहा वाजता हॅाटेल ड्रायडंट येथून रोहित पवार हे विधानभवनाकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते 10 वाजता विधान भवनात दाखल झाले. त्यांनी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर रोहित पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी तेथे सुप्रिया सुळे, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

भाजपाचे  नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्यासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली होती. राज्य सहाकारी बँकेच्या लिलावामध्ये हेरफेर करत बारामती ॲग्रो ने हा साखर कारखाना 50 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  15 दिवसांपूर्वीच ईडीने बारामती ॲग्रो या कंपनीसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. 

दरम्यान, अडचणीत आलेल्या रोहित पवार यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिवसभर शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात हजर झाले असून, ते दिवसभर कार्यालयात असणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading