Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

२६ ते २८ जानेवारी दरम्यान गंगाधर स्वरोत्सवचे आयोजन

पुणे  : पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या स्वरनिनाद संस्थेतर्फे ‘गंगाधर स्वरोत्सव २०२४’ या संगीत महोत्सवाचे शुक्रवार दि २६ ते रविवार दि २८ जानेवारी या कालावधीत आयोजन  करण्यात आले आहे. निसळ यांच्यातर्फे त्यांचे गुरु पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा सांगीतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून महोत्सवाचे यंदाचे हे ९ वे वर्षे आहे. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्राच्या अॅम्फीथिएटर येथे सायंकाळी ६ वाजल्या पासून हा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रम सशुल्क आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सायं ६ वाजता मुराद अली यांच्या सारंगीवादनाने होईल. मुराद अली हे मुरादाबाद घराण्याच्या सहाव्या पिढीचे सारंगी वादक आहेत. यानंतर किरणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पद्मविभूषण हरीप्रसाद चौरासियायांच्या शिष्या असलेल्या आणि ‘फ्ल्युट सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देबोप्रिया चॅटर्जी आणि सुचिस्मिता चॅटर्जी यांचे बासरीवादन होईल. पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.

पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असलेले शंतनू गोखले यांच्या संतूर वादनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. यानंतर ऋजुता सोमण यांचे कथकनृत्य प्रस्तुत होईल. गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्य आणि ज्येष्ठ गायक पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने गंगाधर स्वरोत्सवाचा समारोप होईल.

पं रामदास पळसुले, भरत कामत, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, ईशान घोष, यशवंत वैष्णव, कार्तिक स्वामी, पांडूरंग पवार आणि निखील हरिश्चंद्रकर आदी कलाकार साथसंगत करतील.

Leave a Reply