बांधकाम मजुरांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे : रामललाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त सर्वत्र जल्लोष साजरा होतं आहे. या पश्वभूमीवर पुण्यातील लोहगाव येथील श्रीराम असोसिएट्सच्या डिवाइन गार्डन येथे डोअरस्टेप स्कूल संस्थेच्या सहकार्याने सदर आज बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बांधकाम साईट वर शाळा सुरु केली असून शालेय साहित्य ही वितरित करण्यात आले.
श्री राम प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त आज सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात आहे. असेच डोअरस्टेप स्कूल संस्थेच्या सहकार्याने लोहगांव येथील
डिवाइन गार्डन बांधकाम साईट वर काम करणार्या मजुरांच्या सुमारे 20 ते 25 मुलांना शालेय शिक्षण प्रवाहात आणत त्यांच्यासाठी शाळा सुरु केली असून प्रत्येक विद्यार्थ्यांस गणवेश, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अशी माहिती
श्रीराम असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक, गृहप्रकल्प डिवाइन गार्डन ग्रुपचे संस्थापक
श्री राकेश अग्रवाल, रूचिका अग्रवाल यांनी दिली.
1 ते 14 वर्षाखालील मुलांना या शाळेला शिक्षण, रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तू, समाजात वावरताना घडणाऱ्या गोष्टींचे ज्ञान, वाचन संस्कार दिले जाणार आहे.
तीन दशकांपूर्वी डोअरस्टेप स्कूल या संस्थेची स्थापना रजनी परांजपे यांनी केली. शालेय साहित्य वाटप प्रसंगी शिक्षक अपर्णा शिलवत, शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते.
