कलर्स मराठीच्या पुस्तकातलं सोनेरी पान उघडणार..
कलर्स मराठी वाहिनी मनोरंजन प्रदान करण्यात अग्रेसर आहे. कलर्स मराठीवरील मालिका लोकप्रिय ठरत असतात. सामाजिक, अध्यात्मिक विषयांवरच्या मालिका कलर्स मराठी घेऊन येत असतात. कलर्स मराठीवरील अश्याच २ लोकप्रिय मालिका, प्रेक्षकांनी ज्यांवर भरभरून प्रेम केलं, त्या मालिका आता पुन्हा पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी कलर्स मराठी घेऊन येत आहे सोनेरी पान! ‘तू माझा सांगाती’ व ‘जीव झाला येडापिसा’ या २ लोकप्रिय मालिका आजपासून कलर्स मराठीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा या मालिकांच्या मनमोहक कथनांमध्ये मग्न होतील.

कलर्स मराठी सोनेरी पान, ‘तू माझा सांगाती’, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकथेचा प्रवास व ‘जीव झाला येडापिसा’, शिवा आणि सिद्धी यांची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. तेव्हा नक्की बघा आजपासून सकाळी ९.०० वा. ‘तू माझा सांगाती’ व सकाळी ११.०० वा. ‘जीव झाला येडापिसा’ आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
