‘मला समजलेले बापू’ निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : “राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ” यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित (इ. ८ वी ते १०वी) माध्यमिक शाळां मधील विद्यार्थ्यांकरीता, “मला समजलेले बापू अर्थात् महात्मा गांघी” या विषया वरील, निबंध स्पर्धेचा अंतिम टप्पा असुन शाळांकडुन देखील चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एकुण १४२४ निबंधांपैकी, ११६० निबंध स्पर्धे साठी पात्र ठरले असुन, त्यातील प्रती इयत्ता प्रथम(१), द्वीतीय(१) व तृतीय (२) = ४ व ११ उत्तेजनार्थ अशी प्रती इयत्ता १५ रोख पारितोषिके अशी सु ७५,००० ची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याचे स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
रोख पारितोषिके व सन्मान चिन्हां व्यतिरिक्त ही ‘अभिनव शिक्षण संस्थे तर्फे विजेत्यांना राष्ट्रपुरषांची प्रेरणादायी पुस्तके’ भेट दिली जाणार असून, निबंध स्पर्धेतील ‘पात्र सहभागी विद्यार्थ्यांना’ प्रशस्तिपत्रके देणार असल्याचे संयोजन समितीने जाहीर केले.
सदरचा बक्षीस समारंभ जेष्ठनेते व केरळ चे माजी ऊपमुखमंत्री रमेशजी चेनीतला व मान्यवर नेत्यांच्या हस्ते व विधान सभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षते खाली संपन्न होणार असुन प्रमुख पाहुणे मा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा अशोकराव चव्हाण, काँग्रेस काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, डॅा विश्वजित कदम समवेत इंडीया आधाडी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होईल.
पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजीत जगताप यांनी राजीव गांधी स्मारक समितीने धेतलेल्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन झालेल्या प्रबोधनपर प्रयत्नांमुळे, देशाचा ईतिहास, स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधींची तत्वे इ विषयी विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडेल असे सांगितले व स्मारक समितीच्या कार्यांचे कौतुक केले.
पुणे शहरात ‘निबंध स्पर्धेची’ माहीती देणारे १५० बॅनर्स लावण्यात आले होते व शाळा प्रशासना कडुन देखील ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मानाची वागणुक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, स्वातंत्र्या करीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ ऊभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना, निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन अंतर्मुख करण्याचा अल्प प्रयत्न करण्यात आला आहे…!
बापूंना राष्ट्रपिता किताब कुणी व का दिला..? याची देखील माहीती विद्यार्थ्यांच्या ठायी असल्याचे दिसुन आले. महात्मा गांधींच्या विशाल नेतृत्व व व्यक्तिमत्वाचे, बापूंच्या सत्य, अहिंसा, मानवता आदी असाधारण गुणांचे, स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक पैलु व प्रसंगांचे, मानवी जीवना विषयीच्या दृष्टीकोनाची मीमांसा करण्याचा प्रयत्न आहे. भारत लोकशाही प्रधान देश आहे. हजारों हौतात्म्यांच्या बलीदानानंतर देशास स्वातंत्र्य मिळाले. बापूंच्या अहिंसावादी चळवळीत मोठ्या धर्मनिरपेक्ष शक्तींचा सहभाग होता. प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधी होते..!
साधनांची वानवा व प्रतिकूल परिस्थितीत देखील, बापूं’नी कठोर निग्रह, ईश्वर निष्ठा व आत्मबळाच्या जिद्गीवर अहिंसात्मक व मुत्सदेगीरीच्या जोरावर स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. मातृभुमि विषयी प्रेम, श्रध्दा, निष्ठा व स्वावलंबनाची भावना त्यांनी लोकांमध्ये जागृत केली..! स्वार्थाचा त्याग करत “बापूंची ७ सामाजिक पापें व ११ व्रते” निर्धारीत केली.
(सिध्दांत बिना राजनिती, काम बिना धन) “तत्वहिन – राजकारण व विनाकष्ट-संपत्ती” ही महात्मा गांधींची ७ सामाजिक पापांपैकी २ प्रमुख पापे असल्याचे राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
या प्रसंगी पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुजीत जगताप, कार्याध्यक्ष श्री शिवाजी शिंदे, सुभआषशेठ थोरवे, शाळांमध्ये निबंध स्पर्धेची माहीती पत्रक पोहोचवणे, निबंध गोळा करणे इ कार्य स्मारक समितीचे सदस्य भोला वांजळे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, ॲड फैयाझ शेख, धनंजय भिलारे, संजय अभंग, गणेश मोरे, राजेश सुतार, नरेश आवटे इ उपस्थित होते.
