Wednesday, October 7, 2026
Latest NewsPUNE

श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे विशेष सत्संग 

पुणे : श्रीक्षेत्र अयोध्या येथे दि. २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा ऐतिहासिक-धार्मिक सोहळा साजरा करण्यासाठी पुण्यातील साधू वासवानी मिशनतर्फे विशेष सत्संग आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ ते १ आणि सायंकाळी ६.४५ ते ७:४५ या वेळेत सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात श्री अयोध्येत  होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हा योग साधण्यात आला आहे. सायंकाळच्या सत्रात भक्तीमय वातावरणात सत्संग सेवा होणार आहे.
यावेळी सत्संगात श्री रामाचे कीर्तन आणि हिंदीतील भजन, हवन आणि त्यानंतर मुख्य आरती होईल.यानिमित्त साधू वासवानी आणि दापा जे. पी. वासवानी यांच्या पवित्र समाधींवर  दीपप्रज्वलन केले जाईल. सत्संगानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading