Monday, July 6, 2026
Latest NewsTECHNOLOGY

सोनीकडून ‘इन्झोन बड्स’चे (INZONE Buds) अनावरण

नवी दिल्ली : सोनीने आपल्या नवीन ‘इन्झोन बड्स’  (INZONE Buds) ची घोषणा केली आहे. वापरकर्त्याने गेम जिंकावा यासाठी सोनीने खास तयार केलेल्या प्रसिद्ध ध्वनी तंत्रज्ञानासह खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येईल असे हे नवीन गेमिंग ईयर बड्स आहेत. वैयक्तिक कम्प्युटर (पीसी), मोबाइल आणि कन्सोल गेमप्ले यांच्यावर गेम खेळताना ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) व्यक्तिगत ध्वनी, १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ आणि कमी विलंब यांच्यामुळे एक भान हरपून टाकणारा असा गेमिंग अनुभव देते. जगातील एक सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य ईस्पोर्ट्स संघटना फनॅटिकच्या (Fnatic) सहभागीदारीतून ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) चा जन्म झाला होता. फनॅटिक (Fnatic) यंदा साल २०२४ मध्ये आपल्या कारकि‍र्दीची २० वर्षे साजरी करणार आहे आणि त्यांनी यावर्षी वॅलोरंट चॅम्पियन्स टूरमध्ये (VALORANT Champions Tour) लागोपाठ आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले. अधिक सुधारित ध्वनीसह ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) तुमचा कम्प्युटरवरील किंवा प्लेस्टेशनवरील गेमिंग अनुभव नेहमीप्रमाणे समृद्ध करीत राहील.

नवीन ‘इन्झोन बड्स’  मध्ये खालील वैशिष्ट्ये सामावली आहेत –

१.      आजूबाजूचा गोंगाट सक्रियपणे काढून टाकणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तीकृत अवकाशीय ध्वनी तुम्हाला सर्वात पुढे राहायला मदत करते

२.      या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त म्हणजे सलग १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ असलेले व खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येतील असे गेमिंग ईयर बड्स

३.      गेम खेळताना जास्त आरामदायी अनुभवासाठी ईअर बड्सचा कानाशी कमीतकमी संपर्क

४.      ‘सोनी इन्झोन बड्स’ केवळ युएसबी टाइप-सी डोंगल आणि ब्लुटूथ एलई ऑडिओ कनेक्शनद्वारे (USB Type-C dongle and Bluetooth LE Audio connection) २.४ गिगाहर्टस वायर लेस कनेक्शनला (2.4 GHz wireless connection) समर्थित आहे (codec:LC3)

५.      आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स (AI) सहाय्यीत मायक्रोफोन ऐन कृतीमध्ये मग्न असतानादेखील स्पष्ट ऐकण्यास मदत करतात

६.      कमीतकमी विलंबासह (latency) हे अचूकता वाढवते

७.      तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविण्यात मदत व्हावी म्हणून खास व्यवसायिक गेमर्सच्या सहकार्याने हे ईअर बड्स तयार केले आहेत

८.      केवळ बोटांच्या स्पर्शाने महत्त्वाचे नियंत्रण वापरण्याची सुविधा

९.      इन्झोन हब (INZONE Hub) सॉफ्टवेअर च्या माध्यमातून वैयक्तिकृत अनुभव:

१०.  पर्यावरणपूरक: ‘सोनी इन्झोन बड्स’ च्या पॅकेजिंगमध्ये कोणतेही प्लॅस्टिक वापरले गेलेले नसून यामध्ये पुनर्नविनीकरण केलेले साहित्य (१) वापरले आहे.

 

किंमत आणि उपलब्धता:

. ‘सोनी इन्झोन बड्स’ भारतात सर्व प्रमुख सोनी रीटेल स्टोर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लूसिव्ह), प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकाने, www.ShopatSC.com पोर्टलवर आणि ई कॉमर्स संकेत स्थळांवर १६ जानेवारी २०२४  पासून उपलब्ध असतील.

मॉडेल किंमत (भारतीय रुपयांमध्ये) उपलब्धता तारीख उपलब्ध रंग
इन्झोन बड्स’  (INZONE Buds) १७,९९०/- 22 जानेवारी २०२४  पासून उपलब्ध काळा आणि पांढरा,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading