Saturday, June 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार असून ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेही असतील. दरम्यान, राज्य सरकारनेही याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून २२ जानेवारीला राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने २७ जानेवारी रोजी तपासणीकरिता सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने दिवे ट्रॅक, आळंदी रस्ता कार्यालय, आयडीटीआर (नाशिक फाटा) व संगम ब्रिज मुख्यालय कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आळंदी रस्ता येथील अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आयडीटीआर येथील अनुज्ञप्ती चाचणी व संगम ब्रिज मुख्यालय येथील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरिकांनी, वाहनधारकांनी २२ जानेवारी रोजीच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांची २३ ते २५ जानेवारी दरम्यान सुधारीत अपॉइंटमेंट दिली जाणार आहे.

वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading