श्री प्रभू रामाला समर्पित केलेले श्रीराम जय राम” हर्षित अभिराज यांचे गीत रसिकांच्या भेटीला
श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरी, रामललाच्या मंदिराचे लोकार्पण आणि श्रीरामाच्या मूर्तीच्या स्थापनेमुळे देशात आणि जगात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे औचित्य साधून, भगवान श्री रामाला समर्पित केलेले गीत प्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराजने संगीतबद्ध केले आहे. उगम संगीताचे संस्थापक उदय गाडगीळ यांनी याची निर्मिती केली आहे. हे गीत हर्षित अभिराज यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. हर्षित अभिराज यांनी संस्कृत आणि हिंदी भाषांमध्ये राम स्तुतीची रचना केली आहे. संत तुलसीदासजींनी संस्कृतमध्ये लिहिलेले “श्री रामचंद्र कृपालू” आणि हर्षित अभिराज यांनी लिहिलेले
श्रीराम के जयकार का, गुंजन ये जग, करने लगा…” असे हिंदी गाण्याचे बोल आहेत.
या गाण्यांचे नुकतेच रामनगरी अयोध्या येथे रामभूमीचे महासचिव चंपतरायजी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे गाणे श्री रामचे चाहते आणि भक्तांसाठी सोशल मीडियावर उपलब्ध असून या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार हर्षित अभिराज म्हणाले की, रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा महोत्सव देशभरात साजरा होत असताना आम्ही हे गाणे श्री रामावर तयार केले आहे.
हर्षित अभिराजने मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांनी भारतात आणि परदेशातही अनेक संगीत मैफिलीत सादरीकरण केले आहे. तो आपल्या गायन कौशल्य आणि तंत्र कार्यशाळेद्वारे आगामी इच्छुक गायकांना मार्गदर्शन करतो. अनेक सामाजिक कार्यातही हर्षित यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
