Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी व किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विद्यापीठातील माजी विद्यार्थी संघाच्यावतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक डॉ संजय ढोले, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या श्रीमती. बागेश्री मंठाळकर, ललित केला केंद्राचे प्रा.(डॉ.) चैतन्य कुंटे, मराठी विभागाचे प्रा. प्रभाकर देसाई, लोकशाहीर अण्णाभाऊ अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. प्रतीक दामा यांच्यासह प्रभाताईंच्या ज्येष्ठ शिष्या डॉ अश्विनी वळसंगकर, जपानच्या फ्युमी निगाशी, प्रभाताईंसोबत नेहमी तबल्याची साथ देणारे श्री. माधव मोडक हे उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे १३ जानेवारी २०२४ रोजी पुण्यात निधन झाले होते. पद्मविभूषण भारतीय शास्त्रीय संगीतातल्या ज्येष्ठ गायिका डॉ. अत्रे यांच्या निधनाने संगीत क्षेत्राचे आणि विशेषता भारतीय शास्त्रीय संगीताची खूप मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply