फोन पे द्वारे भारतातील दुचाकी वाहनांच्या डिजिटल इन्श्युरन्सच्या विक्रीत वाढ
पुणे : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या फोन पे ने भारतातील दुचाकी वाहनाच्या डिजिटल इन्श्युरन्सच्या विक्री वाढीमध्ये फोन पे ची भूमिका स्पष्ट केली. गेल्या २ वर्षात फोनपेद्वारे ६५ टक्क्यांपेक्षा डिजिटल इन्श्युरन्सच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय विमा उद्योगातील विकासाचा सूचक बदल आणि ग्राहकांमध्ये वाढलेला विश्वास यामुळे विमा खरेदीसाठी उपभोक्त्यांद्वारे डिजिटलझालेल्या पर्याय स्वीकारण्यात उल्लेखनीय वाढ झाल्याची पाहिली गेली. कंपनीने ७५ दशलक्ष पेक्षा जास्त वाहन इन्श्युरन्स कोटसाठी आणि इतर इन्श्युरन्स उत्पादनांत ४०० दशलक्ष कोटसाठी सुविधा देखील दिली आहे. गेल्या एक वर्षात फोन पे ने ४ दशलक्षपेक्षा जास्त पॉलिसी विकल्या आहेत. डिजिटल इन्श्युरन्सच्या बाजारपेठेत २४ टक्क्यांच्या सीएजीआर वर वाढ होत आहे, ज्यातील एक मोठा भाग फोन पे कडून आहे.
फोन पे इन्श्युरन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले की ,“फोन पे चा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि ग्राहक-क्रेंद्रीत उत्पादनांनी डिजिटल इन्श्युरन्स क्षेत्रातील वाढीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या सकारात्मक वाढीसोबत फोन पे ने भारतातील विमा खरेदीच्या अनुभवात मोठी क्रांती आणली आहे. हेल्थ इन्श्युरन्ससाठी आमचा मासिक प्रीमियम प्लॅन हा आधुनिक भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण, ग्राहक-अनुकूल प्लॅन प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील आणखी एक पाऊल आहे.
मोटार इन्श्युरन्स उत्पादनांसह बाजारपेठेत आघाडी मारून,फोन पेने हेल्थ इन्श्युरन्ससाठी अलीकडेच एक युनिक मासिक प्रीमियम प्लॅन प्रस्तुत केला जो विमा उद्योगातील पहिला या प्रकारचा एक नवीन प्लॅन ठरला. हा प्लॅन दोन महत्त्वाचे दृष्टीकोन लक्षात घेऊन सादर केला आहे. एक म्हणजे महिन्याच्या महिन्याला पेमेंटची सुविधा ज्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयच्या पलीकडे सर्वांसाठी परवडणारा असा आहे. यामुळे एकरकमी पेमेंट करण्यापेक्षा महिन्याच्या महिन्याला लहान लहान रकमेच्या हप्त्यात पेमेंटची सुविधा केल्यामुळे लोकांवरील प्रीमियमचा आर्थिक भार कमी झाला आहे.
