पोलिसांसाठी आपुलकीचा तीळगूळ समारंभ
पुणे : संक्रांतीच्यानिमित्त विश्रामबाग पोलीस स्टेशन मधील पोलीस बंधूसाठी स्नेहाचा आणि महिला पोलिसांसाठी हळदी कुंकू समारंभ आज
शनिवार पेठ मेहूनपुरा सार्वजनिक गणेशोतसव मंडळ लोकशिक्षण मित्र मंडळ , लक्ष्मी रस्ता साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ आज तीन गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार एकत्रित रबिवला.
या प्रसंगी प्रत्येकास तीळगूळ देत औक्षण केले; तसेच वकील प्रताप दादा परदेशी व ढोल महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांच्या हस्ते मंडळाच्या वतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यास दोन कपाटे भेट देण्यात आली.
प्रताप परदेशी यांनी सांगितले की, पोलिसांनी कार्यकर्त्यांचं सामाजिक कार्य जाणून घ्यावे, गणेशोत्सव हा विधायक सांस्कृतिक उपक्रमांचा उत्सव आहे ;ही मंडळे उत्सवाचं पावित्र्य जपत आहेत , डी जे व उत्सवातील दुषप्रवृत्ती फक्त काही प्रमाणात आहे.
ठाकूर यांनी सांगितले की, कार्यकर्ते हे पुण्याचे श्वास आहेत .आणि गणेशाची भक्ती करत आता सोबत श्री रामाची भक्ती करत राष्ट्र निर्मितीचे कार्य करत आहे…कार्यक्रमास
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्ट चे पीयूष शाह, शनिवार पेठ मेहूनपुरा मंडळाचे सचिन शिंदे , लक्ष्मी रस्त्यावरील लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पवार ह्यांनी केले होते, रवींद्र गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन, दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाणे , तुकाराम निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे आदी 20 पोलीस उपस्थित होते.
कमलेश भडसावळे ,अमर राव, नरेंद्र व्यास तसेच मंडई मंडळाचे विश्वास भोर, किरण सोनीवाल , विलास ढमाले , आदी जय गणेश व्यासपीठ चे कार्यकर्ते उपस्थित होते… पीयूष शाह यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
