Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने रविवारी नमो वॉकेथॉन चे आयोजन

पुणे; ता१७-भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी नमो वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात माहिती अध्यक्षा सौ हर्षदा फरांदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व सौ अमृता ताई फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी या नमो वॉकेथॉन चा शुभारंभ होईल. ही वॉकेथॉन फर्ग्युसन कॉलेजच्या गेट नंबर ३ पासून सुरू होवून घोले रोड , बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना येथून पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालय असा या वॉकेथॉन चा मार्ग असेल.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ५ महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती सौ.फरांदे यांनी दिली.या पत्रकार परिषदेला सरचिटणीस प्रियांका शेंडगे, गायत्री खडके. आरती कोंढरे ,उज्वला गौड,भावना शेळके, खुशी लाटे, प्रेरणा तुळजापूरकर आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading