न्यू जावा ३५० मध्ये डिझाइन, कामगिरी आणि सुरक्षेचा अनोखा मेळ, २.१४ लाख रुपयांनी लाँच
पुणे – जावा येझ्दी मोटरसायकलला नव्याने तयार करण्यात आलेली जावा ३५० सादर करताना आनंद होत आहे. अभिजात सौंदर्य आणि दमदार इंजिनियरिंग यांचा अनोखा मेळ साधणारी ही गाडी २,१४,९५० रुपये (एक्स शोरूम दिल्ली) किंमतीत उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रसिद्ध मोटरसायकल तिची ऐतिहासिक वैशिष्ट्ये, सर्वोत्तम कामगिरी यांचा मिलाफ साधणारी असून जावाच्या प्रसिद्ध परंपरेला जागणारी आहे. नव्या जावा ३५० चे अॅक्सलरेशन जलद, हाताळणी व ब्रेकिंग सर्वोत्तम असून ती आज भारतात उपलब्ध असलेली सर्वात सुरक्षित क्लासिक मोटरसायकल आहे.
जावा ३५० आता तपकिरी, काळा आणि नव्या मिस्टिक ऑरेंज रंगात उपलब्ध आहे. पॉलिश्ड क्रोम आणि गोल्ड पिनस्ट्रिप्ससह ती सौंदर्याची समीकरणे नव्याने प्रस्थापित करणारी आहे. या मोटरसायकलचे आकर्षक डिझाइन, प्रीमियम कारागिरी, जलद अॅक्सलरेशन, सर्वोत्तम ब्रेकिंग क्लासिक मोटरसायकल्समध्ये सर्वात चांगले आहे. फिट आणि फिनिशमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करणारी ही मोटरसायकल अभिजाततेचे प्रतीक आहे.
जावा ३५० मध्ये लांब व्हीलबेस आणि १७८ एमएम ग्राउंड क्लियरन्स देण्यात आला असून त्यामुळे रायडिंगचा दर्जा आणखी उंचावतो. या बाइकचे अचूक मोजमाप आरामदायीपणा आणि स्टाइल यांच्यात समतोल साधणारे व जावाच्या अभिजात डिझाइनशी सुसंगत आहे.
आधुनिक रायडरसाठी खास तयार करण्यात आलेल्या जावा ३५० मध्ये सर्वोत्तम ब्रेकिंग यंत्रणा, २८० एमएम फ्रंट आणि २४० एमएम रियर डिस्क ब्रेक्स तसेच ड्युएल चॅनेल एबीएससह देण्यात आली आहे. या यंत्रणेमध्ये सुरक्षा आणि अचूक नियंत्रण यांचा समावेश करण्यात आल्यामुळे प्रत्येक राइड सुरक्षित आणि थरारक अनुभव देणारी ठरते. नव्या जावा ३५० मध्ये रायडिंग आणि हाताळणीसाठी खास सुविधा देण्यात आल्या असून आधुनिक काळातील अभिजात मोटरसायकल कशी असावी याचे ती उत्तम उदाहरण आहे.
३२४ सीसी लिक्विड कूल्ड इंजिन लाभलेली जावा ३५० जलद अॅक्सलरेशन, लो- ड आणि मिड- रेंज पंचसह देते. २८.२ एनएम टॉर्क रेव रेंजमध्ये कमी प्रमाणात मिळतो, तर २२.५ पीएस आणि जावा ३५० शहरी तसेच खुल्या रस्त्यांसाठी अतिशय योग्य असून ती प्रत्येकवेळेस सफाईदार व तणावमुक्त अनुभव देते. मोटरसायकलमध्ये असिस्ट आणि स्लिप (ए अँड एस) क्लच देण्यात आल्यामुळे रायडिंग सोपे व सहज झाले आहे.
द जावा वे
जावा ३५० ही केवळ एक मोटरसायकल नाही, तर ते जावा वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असाधारण रायडिंग अनुभवाचे प्रतीक आहे. त्यामध्ये जावाची ताकद, दणकटपणा आणि थरार सामावलेला आहे. त्याशिवाय अभिजातता व नाविन्याचा समावेश करत त्याला आधुनिक इंजिनियरिंगची जोड देण्यात आली आहे. जावा ३५० ही अशाप्रकारची पहिलीच लिजंडरी मोटरसायकल आहे, जी पूर्वीच्या जावा रेसर्सप्रमाणे ताकदवान कामगिरीचे आश्वासन देते. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले डिझाइन, आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा सोयीस्करपणा यांसह जावा पोर्टफोलिओ क्लासिक मोटरसायकल कशाप्रकारची असते हे दर्शवणारी आहे. रायडर्सना आकर्षक रूप, कामगिरी, हाताळणी आणि आरामदायी यापैकी कोणत्याही बाबतीत तडजोड करावी लागत नाही… त्यासाठी एकच मार्ग आहे – द जावा वे.
नवी जावा ३५० ही केवळ एक मोटरसायकल नाही, तर नव्याने जन्माला घालण्यात आलेला वारसा आहे, असे जावा येझ्दी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग दोशी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘श्रीमंत वारसा आणि तरीही भविष्यवेधी सुविधा यांचा मिलाफ असणारे मशिन आम्ही तयार केले आहे. ही मोटरसायकल द जावा वे – अबिजात रूप आणि आधुनिक सुविधा यांचे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की जावा ३५० रायडर्सना आपला उच्च दर्जा, आकर्षक लूक्स आणि सोप्या हाताळणीसह आनंद देईल.’
जावा ३५० निष्ठावान ग्राहक आणि नव्या पिढीच्या रायडर्सना आकर्षिक करण्यासाठी सज्ज आहे. हा केवळ प्रवास नाही, तर काळानुसार केलेला प्रवास आहे, जो आधुनिक युगाची समीकरणे नव्याने प्रस्थापित करेल.
सध्या जावा पोर्टफोलिओमध्ये जावा ३५०, जावा ४२, जावा बॉबर आणि जावा पेराक यांचा समावेश आहे.
