Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

AI कंपनीच्या सीईओ महिलेने केला पोटच्या मुलाचा खून; सफाई कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आला प्रकार

पणजी : एआय एथिक्समधील जगातील टॉप १०० प्रतिभावान महिलांपैकी एक आसलेल्या; अन् ‘माईंडफुल एआय लॅब’ या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ हिने स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिमूरड्याचा मृतदेह बॅगेत टाकून गोव्याहून कर्नाटकला जात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. घटस्फोटित पतीसोबत मुलाची भेट होऊ नये, या उद्देशाने सूचना हिने हे कृती केल्याची माहिती आहे.

असा उघडकीस आला खुनाचा प्रकार .. 

रविवारी सूचना सेठ ही गोव्यातील कँडोलिम बीच येथील एका हॉटेलमध्ये आपल्या मुलासोबत राहायला होती. सोमवारी (दी.8)  हॉटेलमधून चेकआऊट करुन बाहेर पडत असताना तिचा चार वर्षांचा मुलगा तिच्यासोबत नव्हता. ती एकटी हॉटेल मधून बाहेर पडत असल्याचे पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी सूचनाला मुला विषयी विचारले. तेव्हा तिने मुलाला आधीच घरी पाठवून दिल्याचे सांगीतले. वास्तविक तो तिच्याच सोबत रूममध्ये गेल्याचे कर्मरचार्यांनी पाहीले होते. सूचनाने हॉटेलमधून चेक आऊट केल्यानंतर सफाई कर्मचारी तिची खोली साफ करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिथे रक्ताचे डाग दिसले. ते पाहून हॉटेल कर्मचारी चक्रावून गेले. अन् त्यांनी लगेच गोवा पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली अन् सूचना ज्या टॅक्सीमध्ये बसून गेली त्या टॅक्सी चालकांचा फोन नंबर शोधून काढला. अन् त्याला संपर्क करून कोकणी भाषेत संवाद साधला. तसेच टॅक्सी कर्नाटकातील चित्रदुर्ग भागातील पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. टॅक्सी चालकाने पोलिसांनी सांगितले तसेच केले. या टॅक्सी चालकांच्या हुशारीने सूचना पकडली गेली. तिच्या सोबत असलेल्या बागेतून तिच्या मुलांचा मृतदेह सापडला आहे.

कोण आहे सूचना सेठ?

सूचना सेठची ‘माईंडफुल एआय लॅब’ ही कंपनी डेटा सायन्स टीम आणि स्टार्टअप्सना सल्ला देण्याचे काम करते. यासोबतच ते मशीन लर्निंग सोल्यूशन्सही देतात. सूचनाला या क्षेत्रात १२ वर्षांचा अनुभव आहे. २०२० मध्ये एआय एथिक्समधील टॉप १०० प्रतिभावान महिलांमध्ये तिचा समावेश झाला होता. सूचना सेठच्या लिंक्डइन अकाऊण्टनुसार तिने हार्वर्ड विद्यापीठाच्या बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलोशिप केली आहे. २०२० मध्ये तिने ‘द माईंडफुल एआय लॅब’ या स्टार्टअपची सुरुवात केली. तिच्याकडे आर्टिफिशियल लँग्वेज, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि टेक्स्ट मेलिंग या क्षेत्रात चार अमेरिकन पेटंट्स आहेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading