Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन

पुणे :  महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) देण्याचा निर्णय झाला आहे. ही जागा मुलांना खेळासाठीच राहू द्यावी अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करून करण्यात आली. कात्रज येथील क्रीडागंणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन घेण्यात आले. ह्या वेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले. बरेच खेळाडू तिथे उपस्थित होते. त्यानंतर कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त  विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी काँग्रेस  अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. महापालिकेच्या डीपीमध्ये या प्रकारचे आरक्षण नाही. शहरात खेळासाठी मैदानाची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढूण घेणे योग्य नाही. पुणे शहरामधे मुलांना खेळण्यासाठी पुरेसे क्रीडांगण नाही असे असताना जी जागा क्रीडांगणसाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रज डेरीला ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही. तसेच कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान हक्काचे मैदान आवश्यक आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरुन आपला विरोध दर्शवत आहे.’’

यावेळी पुणे शहराध्यक्ष माननीय अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उध्दव ठाकरे गट) गजानन थरकुडे, संजयजी मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, शिवा मंत्री, अजित दरेकर, रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने, राजू ठोंबरे, कृष्णा सोनकांबळे, संतोष पाटोळे, NSUI अध्यक्ष अभिजित गोरे, प्रियंका रणपिसे, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, सतिश पवार, यशराज पारखी, बाळासाहेब मारणे, लतेंद्र भिंगारे, मुन्नाभाई शेख, यासीन शेख, अभिजीत महामुनी, आशुतोष शिंदे, आकाश माने, ओम भंवर, उषा राजगुरू, रेखा घेलोत, नलिनी दोरगे, छाया जाधव, सुंदर ओव्हाळ, मोतीबाई उडते, सिमा महाडिक, शारदा विर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, दिलीप लोळगे, सेल्वराज ॲन्थोनी, नागेश खडके, संजय कवडे, दत्ता जाधव आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading