Monday, August 31, 2026
Latest NewsTECHNOLOGY

वी ची गेमलॉफ्टसोबत धोरणात्मक भागीदारी सबस्क्रायबर्सना जागतिक दर्जाचे हायपर कॅज्युअल गेम्स उपलब्ध करवून देणार

आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने जागतिक कीर्तीचे मोबाईल व्हिडिओ गेम डेव्हलपर गेमलॉफ्टसोबत भागीदारी केली आहे.  वी युजर्सना वी ऍपवर वी गेम्समार्फत ऍक्शनऍडव्हेंचरस्पोर्ट्सरेसिंग आणि इतर अनेक शैलीतील हायपर कॅज्युअल गेम्सची विशाल श्रेणी उपलब्ध करवून देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहेया भागीदारीमुळे आता वी ग्राहक गेमलॉफ्ट ओरिजिनल्स आणि डेंजर डॅशब्लॉक ब्रेकर अनलिमिटेडलुडी बबल्सअस्फाल्ट रेट्रो आणि इतर अनेक लोकप्रिय गेम्स कोणतेही अतिरिक्त शुल्क  भरता मिळवू शकतील.

वी युजर्सना वी ऍपवर वी गेम्समार्फत आणि फन गेम्स सेक्शनमध्ये जाऊन या गेमिंग बोनान्झाचा लाभ घेता येईलवी गेम्सवरील गेमलॉफ्ट ऑप्शन्सचा लुक पूर्णपणे नवीन आणि वापरायला अतिशय सोपा आहेयामध्ये अत्याधुनिक अँटीफ्रॉड डिटेक्शन आणि सिक्युरिटी सोल्युशन देखील आहे.

गेमलॉफ्टसोबत वी ची भागीदारी आपल्या युजर्सना गेमिंग ऑप्शन्स कॅटेगरीतील सर्वोत्तम गेम्स तसेच मोबाईल गेमर्सना सर्वोत्तम अनुभव पुरवण्याचीइमर्सिव्ह गेम्स उपलब्ध करवून देण्याची वीची बांधिलकी अधोरेखित करतेवी ग्राहकांना अतुलनीय गेमिंग अनुभव पुरवण्यासाठी वी ने हे आणखी एक महत्त्वाचे पुढचे पाऊल उचलले आहे.

सध्या सबस्क्रायबर्सना उपलब्ध करवून देण्यात आलेल्या या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाहीनजीकच्या भविष्यकाळात अरेना ही गेमलॉफ्टची सबस्क्रिप्शनवर आधारित टूर्नामेंट सेवा सुरु करण्याची वी ची योजना आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading