Monday, August 31, 2026
BusinessLatest News

रॅपिडोने लाँच केले नवे ब्रँड कॅम्पेन ‘’५ नहीं तो ५०’’ गॅरेंटी

नवी दिल्ली : रॅपिडो ही भारतातील अग्रगण्य अॅप-आधारित प्रवास सेवा आहे. रॅपिडो “५ नही तो ५०” गॅरंटी ऑटो मोहिमेद्वारे प्रवासात क्रांती घडवणार आहे. वापरकर्त्यांना ५ मिनिटांत वाहन बुक होण्याची हमी ही मोहिम देते. जर त्यासाठी विलंब झाला तर रॅपिडोच्या वतीने ५० रॅपिडो पॉइंट्स देण्यात येतील. हा ग्राहक-केंद्रित उपक्रम दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे आणि बेंगळुरू येथील प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. प्रवासाच्या अनुभवात बदल घडवून आणण्यासाठी, अतुलनीय सुविधा, विश्वासार्हता आणि वापरकर्त्यांना समाधान देणारा हा उपक्रम आहे.

महिलांना अनेकदा ऑटो शोधण्याचा त्रास होतो. विशेषतः अशा महिलांसर प्रवाशांची मोठी समस्या मिटवणारा रॅपिडोचा “५ नही तो ५०” हा उपक्रम आहे.  या जाहिरात मोहिमेमध्येही प्रमुख महिला नायकांचा समावेश आहे. आकर्षक आणि संस्मरणीय जिंगलसह जोडलेल्या तीन जाहिरातींची मालिका रॅपिडो ऑटो घेऊन येत आहे.

रॅपिडोची गॅरंटीड ऑटो कॅम्पेनमध्ये प्रवाशांना येणाऱ्या ऑटोच्या अनुभवामध्ये कसे परिवर्त होते हे दर्शविण्यात आले आहे. कन्नड, इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि मराठीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या प्रेक्षकांना प्रतिसाद दिला आहे.

रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी “५ नही तो ५०” उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले, “आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्रवासाचा चांगला अनुभव वाढवण्याचा सतत प्रयत्न करतो. ‘5 नही तो 50’ गॅरंटी सादर करून, ऑटोची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची सामान्य निराशा दूर करण्याचा आमचा हेतू आहे. लोकांच्या प्रवासात क्रांती घडवून आणणारा एक अनोखा आणि दिलासादायक अनुभव देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचीही खात्री मिळेल आणि ऑटो शोधण्यात आणि वाटाघाटी करण्यात अडकून पडण्याची कटकटही मिटेल.”

ही ऑफर म्हणेज ग्राहकांच्या समाधानासाठी रॅपिडोची वचनबद्धता सिद्ध करणारी आहे. रॅपिडोची “५ नही तो ५०” गॅरंटी हा उपक्रम एक नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी तयार आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या वॉलेटमध्ये रॅपिडो कॉइन्सचा अतिरिक्त लाभ घेत असताना त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी आरामात पोहोचता येईल.

“गॅरंटीड ऑटो” मोहिमेपूर्वी, रॅपिडोची “बाईक वाली टॅक्सी, सबसे सॅक्सी” मोहिम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली होती. नेटिझन्सदने हा उपक्रम उचलून धरला होता. ही मोहीम, डिजिटल लँडस्केपवर अमिट छाप सोडत, अग्रगण्य सर्जनशील उपायांसाठी रॅपिडोची वचनबद्धता दर्शवते.

“५ नहीं तो ५०” ही  संकल्पना रॅपिडोची नवीनतम जाहिरात मोहीम आहे. त्रास-मुक्त प्रवासाचा अनुभव वाढवत, रॅपिडोने पुन्हा एकदा आपण ग्राहक-केंद्रित सेवा देत प्रत्येक राईडचा आनंद देण्यास वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading