ICICI प्रुडेन्शियल लाइफ Q2-FY2024 मध्ये क्लेम सेटलमेंटमध्ये अव्वल स्थानावर
ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंटचे प्रमाण 98.14%
ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स खासगी क्षेत्रातील जीवन विमा कंपन्यांमध्ये क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत अव्वल आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा सर्वोत्तम क्लेम सेटलमेंट रेशो 97.9% होता. ग्राहक तसेच त्यांच्या कुटुंबियांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठीची ही त्यांची वचनबद्धता आहे.
विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे क्लेम सेटलमेंटचे प्रमाण 98.7% होते आणि नैसर्गिक मृत्यूचा दावा निकाली काढण्यासाठी सरासरी वेळ 1.2 दिवस होता. हे दावेदारांना दाव्याची रक्कम त्वरित मिळण्याची खात्री देते.
*ही माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
| लाईफ इन्शुरन्स कंपनीचे नाव | क्लेम सेटलमेंट रेशो Q1-FY2024 | क्लेम सेटलमेंट resho Q2-FY2024 |
| आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स | 97.9% | 98.14% |
| टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स | 77.3% | 90.55% |
| एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स | 96.7% | 96.62% |
| बजाज अलाईंझ लाईफ इन्शुरन्स | 93.5% | 91.79% |
| मॅक्स लाईफ इन्शुरन्स | 86.3% | 95.90% |
| एसबीआय लाईफ इन्शुरन्स | 95.8% | 95.67% |
वरील टेबल क्लेम सेटलिंगमध्ये ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे सातत्य दर्शविते. कंपनी ग्राहक-केंद्रित आहे आणि तिचा ‘क्लेम फॉर शुअर’ सेवा उपक्रम सर्व पात्र मृत्यू दावे आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर 1 दिवसात निकाली काढण्याची खात्री देतो.
