Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सेट परीक्षेची तारीख जाहीर

 

पुणे, २९ – राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात सेटची घोषणा करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने ७ एप्रिल २०२४ रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सेटची ही ३९ वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन) होणारी ही शेवटची परिक्षा असणार आहे. तर यानंतरची ४० वी सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते. १७ शहरांमधील जवळपास २६२ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. ज्यात जवळपास सवा लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading