Monday, July 6, 2026
Latest NewsSports

फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टेडियम: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची उद्घाटनीय आवृत्ती 2 मार्चपासून

मुंबई : क्रिकेटचा थरार रस्त्यांवरून स्टेडियमवर आणण्याच्या एक अग्रगण्य वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या सीसीएस स्पोर्ट्स एलएलपीने सोमवारी (27 नोव्हेेंबर) इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची (आयएसपीएल) घोषणा केली. भारतातील पहिलीवहिली टी-टेन  (टी-10) टेनिस बॉल स्पर्धा असलेल्या या लीगचा थरार स्टेडियममध्ये बसून अनुभवता येणार आहे. आयएसपीएलची उद्घाटनीय आवृत्ती 2 ते 9 मार्च 2024 या कालावधीत खेळली जाणार असून या अनोख्या उपक्रमामध्ये 19 रंजक सामन्यांचा समावेश आहे. या टेनिस लीगच्या माध्यमातून युवा आणि प्रतिभावंत क्रिकेटपटूंना त्यांचे अंगभूत कौशल्य दाखवण्याची अभूतपूर्व संधी मिळेल.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये मुंबई (महाराष्ट्र), हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), बेंगळुरू (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) असे सहा फ्रँचायझी संघ खेळतील. सर्व फ्रँचायझींचे सामने अद्ययावत स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. ज्यामुळे खेळाडू आणि चाहत्यांच्या सेलिब्रेशनमध्ये भर पडेल.

आयएसपीएलच्या केंद्रस्थानी क्रिकेटपटूंच्या विशाल समुदायाला सशक्त बनवण्याची दृष्टी आहे जे त्यांच्या आयडॉलसाठी सुसज्ज स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतात. अशा अनेक प्रतिभावान खेळाडूंसमोरील अडथळे आणि आर्थिक आव्हाने ओळखून रस्ते आणि स्टेडियममधील अंतर कमी करणे, हे आयएसपीएलचे ध्येय आहे.  ही लीग अशा अनेक खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर त्यांची क्षमता दाखवून त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

बीसीसीआयचे खजिनदार तसेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे कोअर कमिटी सदस्य आशीष शेलार म्हणाले की, आयएसपीएल ही केवळ एक स्पर्धा नाही; महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी हा एक परिवर्तनकारी प्रवास आहे. सहभागी हे केवळ टी-टेन फॉरमॅटमध्येच स्पर्धा करतील असे नाही तर अनुभवी रणजीपटूंकडून त्यांना अमूल्य कोचिंग टिप्स आणि सल्ला देखील मिळेल. खेळाडूंमध्ये खेळातील कौशल्ये आणि समज वाढवणे आणि क्रिकेटच्या जगात त्यांच्या भविष्यातील यशाचा मार्ग तयार करणे हा या मेंटॉरशिप संधीचा उद्देश आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे कोअर कमिटी सदस्य अमोल काळे यांनी, आयएसपीएल ही लीग केवळ एक गतिमान आणि मनोरंजक क्रिकेट फॉरमॅटच सर्वांसमोर आणत नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, युवा खेळाडूंसाठी असामान्य प्रतिभेचे दरवाजे खुले करत आहे. हे खेळाडू अनेकदा दुर्लक्षित असतात. मात्र,  स्टेडियममध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी आयएसपीएल एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्यांना त्यांचे अपवादात्मक कौशल्य व्यापक प्रेक्षकांसमोर दाखवता येणार आहे, असे ते म्हणाले.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे मुख्य मेंटॉर (मार्गदर्शक) रवी शास्त्री म्हणाले, आयएसपीएल ही अनेकांच्या क्रिकेटच्या स्वप्नांना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर भरभराटीची संधी देईल. तळागाळातील प्रतिभेची जोपासना करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल मी आयोजकांचे कौतुक करतो. या रोमांचक उपक्रमातून निःसंशयपणे उभ्या राहणार्‍या यशोगाथा (सक्सेस स्टोरीज्) पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एक क्रिकेट कार्निव्हल होण्याचे वचन देते, जे स्टेडियम क्रिकेटच्या भव्यतेसह रस्त्यांचा उत्साह विलीन करते. या लीगने चाहते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींना भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाच्या जन्माचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी 20 डिसेंबर 2023 पूर्वी www.ispl-t10.com  या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading