Monday, October 19, 2026
Latest NewsPUNE

‘ताइवान’ शिष्टमंडळाची विद्यापीठाला भेट

पुणे : ताइवानमधील नॅशनल चुंग हिंग युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शुक्रवारी भेट दिली. या शिष्टमंडळात नॅशनल चुंग हिंग युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे उपाध्यक्ष चौ ची-चुंग, आर अँड डी विभागाचे अधिष्ठाता जेन-मिंग साँग आणि भारतातील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे मुमिन चेन आदींचा समावेश होता. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत त्यांच्याशी चर्चा केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या या भेटी दरम्यान तीन जणांच्या या शिष्टमंडळाने विविध विभागांची पाहणी करत विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती घेतली. तसेच भविष्यातील कोलॅबरेशनबद्दलही चर्चा केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading