“इंडीया आघाडी चा ऊमेदवार विजयी करण्यासाठी आम आदमी पक्ष कटीबध्द”….!!! – अमित म्हस्के
पुणे : आम आदमी पक्षाच्या युवा आघाडी च्या प्रमुख पदी अमित म्हस्के यांची निवड झाल्यानंतर.. ‘इंडीया आघाडी’ एकजुट मजबुत व्हावी व पुणे लोकसभा मतदार संघांतील ‘काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडी’ची सरशी होणे साठी, आमचे प्रिय स्नेही व काँग्रेसचे जेष्ठनेते, पुणे मनपा’चे माजी नगरसेवक, इंटक कामगार नेते, राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अभ्यासु प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची,
त्यांचे ‘नारायण पेठेतील संपर्क कार्यालयात’ आज सदीच्छा भेट धेतली..! गोपाळदादा यांना या प्रसंगी आम्ही संत तुकाराम महाराजांचे पुस्तक भेट दिले.. त्यांनी ही माझा यथोचित सत्कार केला..!! या प्रसंगी, अक्षय म्हस्के, ॲड स्वप्नील जगताप, डॉ. अभिजीत बाबर, गणेश शिंदे, पै शंकर शिर्के, संजय अभंग इ उपस्थित होते..!
