Sunday, October 18, 2026
Latest NewsPUNE

दिल्लीत अभाविपच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उभारण्यात येईल इंद्रप्रस्थ नावाची टेंट सिटी

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र च्या वतीने आज दि. २५ नोव्हेंबर ला पत्रकार परिषद घेऊन अभावीपच्या ‘अमृत महोत्सवी वर्ष अंतर्गत दि. 7 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे पोस्टर विमोचन करण्यात आले. यावेळी, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शरद गोस्वामी, प्रदेश मीडिया संयोजक प्रगती कराड, पुणे महानगर सहमंत्री आरोह कुलकर्णी उपस्थित होते.

अभाविप चे 69 वे राष्ट्रीय अधिवेशन हा चार दिवसीय कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातील छात्र शक्ती ला एकत्र आणणे आहे. अभाविप, आपल्या संघटनात्मक प्रवासाची 75 वर्षे पूर्ण करत असून, तरुणांना त्यांच्या संघटनात्मक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि विद्यार्थी चळवळींमध्ये अभाविप ची भूमिकेची जाणीव करून देऊन, देशभरातील तरुणांचा हा मेळावा भारताची व्याख्या करणारी ‘विविधतेतील एकता’ दाखवेल.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्राच्या इतिहासाशी आणि मुळांशी जोडून त्यांना आधुनिकतेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना ‘राष्ट्र’ म्हणून भारताचा अखंड प्रवास समजून घेण्यास सक्षम करते. यासाठी अभाविपने या परिषदेचा एक भाग म्हणून विविध उपक्रम राबविले आहेत.

अभाविप राष्ट्रीय अधिवेशन डीडीए ग्राउंड, बुरारी, दिल्ली येथे आयोजित केले जाईल, जिथे ‘इंद्रप्रस्थ नगर’ नावाचे तंबू शहर तयार केले जाईल. या टाऊनशिपमधील “मुख्य सभागृहाला अभाविप चे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे माजी सरकार्यवाह स्व. श्री मदनदास देवी” जी यांना समर्पित आहे आणि त्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तंबू शहराच्या द्वारा ला महाराजा सूरजमल आणि महाराजा मिहिर भोज यांसारख्या भारतीय ऐतिहासिक व्यक्तींच्या नावावर नाव देण्यात आले आहे. याकरिता, डीडीए मैदानावर या तंबू शहराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की,“इंद्रप्रस्थ नगर दिल्ली येथे देशभरातील छात्रशक्ती एकत्रित येणार आहे. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश म्हणून शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्त हिंदवी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. ही यात्रा दुर्गराज रायगड ते इंद्रप्रस्थ नगरी दिल्ली पर्यंत बाईक वर दिनांक 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा दाखवणारा रथ आणि 15 बाईक चालक सहभागी असणार आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली इ. राज्यातून ही यात्रा 2100 कि.मी. प्रवास करेल. यात्रेदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जनमानसात पोहचवले व शिवराज्यभिषेक ३५० वर्ष साजरे करण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading