fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

चांगल्या भूमिकांद्वारे रसिकांना सदैव हसते-खेळते ठेवेन : अशोक सराफ


पुणे : रसिक प्रेक्षकांच्या सदोदित मिळत गेलेल्या सदिच्छा आणि प्रोत्साहन यामुळे माझा अभियन क्षेत्रातील कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे. भविष्यातही मी तुम्हाला चांगल्या भूमिकांद्वारे हसते-खेळते ठेवण्याचा प्रयत्न करेन, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
भाजपाचे पुणे शहर सदस्य अजित जगताप आणि सुजाता जगपात यांनी आमदार नाट्यमहोत्सवाचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन केले होते. वयाची 75 वर्षे तर रंगभूमीवरील 50 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त कोथरूडकरांच्यावतीने सराफ यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सराफ यांचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काजूचा हार आणि स्मृतिचन्ह देऊन करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना सराफ बोलत होते. अजित जगताप, सुजाता जगताप, डॉ. संदीप बुटाला, पुनित जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सुरुवातीस अजित जगताप यांनी आमदार नाट्यमहोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. महोत्सवाची सुरुवात प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या सारखं काही तरी होतंय! या नाटकाने झाली. दुसऱ्या दिवशी संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, प्रसाद बर्वे यांची भूमिका असलेले नियम व अटी लागू हे नाटक सादर झाले. महोत्सवाचा समारोप अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हॅक्यूम क्लिनर या नाटकाने झाला. महोत्सवाला रसिकांनी उदंड प्रतिसाद देत नाटकांचा आनंद लुटला. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्षे आहे. तत्पूर्वी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सराफ पुढे म्हणाले, रसिकांच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालेला हा सत्कार अन्‌‍ कौतुक कधीच विसरू शकणार नाही. सत्काराचा क्षण माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक सराफ यांनी गेली 50 वर्षे आपल्या अभिनयाद्वारे रसिकांचे मनोरंजन केले आहे. ते भूमिकांमधून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकाराचा सत्कार होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. खेळाडू, कलाकार यांच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात पण अशोक सराफ यांच्या कारकिर्दीने सदैव उंच भरारी घेतली आहे. कोथरूडकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत आहे.
दहशतवाद्यांना पकडण्यात मोलाची भूमिका बजाविणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस कर्मचारी अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण यांचा तसेच नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर यांचा विशेष सत्कार चंद्रकांत पाटील व अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले तर आभार सुजाता जगताप यांनी मानले.
फोटो ओळ : आमदार नाट्यमहोत्सवात आयोजित सत्कार सोहळ्यात पुनित जोशी, डॉ. संदीप बुटाला, चंद्रकांत पाटील, अशोक सराफ, अजित जगताप आणि सुजाता जगताप.
प्रति,
मा. संपादक
आमदार नाट्यमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
अजित जगताप
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस (मो. 9922907801)

Leave a Reply

%d