fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ पुण्यात पदयात्रा

पुणे : ‘हर घर सावरकर’ समिती आणि ‘भारत इस्रायल मैत्री मंच’ यांच्या वतीने आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या समर्थनार्थ तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

वीर सावरकर स्मारक येथून पदयात्रा सुरु होऊन टिळक रस्ता येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ येथे यात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत इस्रायलला पाठिंबा दर्शवला. भारत इस्रायल मैत्री मंचचे रणजीत नातू, विद्याधर नारगोलकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, विराट हिंदुस्थान संगमचे जगदीश शेट्टी, इस्त्रायली नागरिक अदेलीया पेनकर, विश्व हिंदू परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, यांच्यासह ३०० देशप्रेमी बांधव सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले, इस्रायल हे आतंकवादाचा प्रतिशोध घेत आहे. आतंकवादाचा प्रतिशोध घेणाऱ्या इस्रायलच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.

देवव्रत बापट म्हणाले, हमास या आतंकवादी संघटनेच्या आक्रमणापासून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे. हमासच्या भ्याड आक्रमणाचा निषेध करण्यासाठी, तसेच या आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

ससून फणसपुरकर, इस्रायली नागरिक अदेलीया पेनकर, हिंदु जनजागृती समितीच्या क्रांती पेटकर यांनी मनोगत व्यक्त केले. या पदयात्रेला भारतात राहणारे इस्रायली बांधवही सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d