प्रियांशु पैन्युलीची “पिप्पा” मधल्या भूमिकेचं होतंय सोशल मीडियावर कौतुक
“एक्सट्रॅक्शन,” “मिर्झापूर,” “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” आणि “भावेश जोशी” मधील उल्लेखनीय भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला प्रतिभावान अभिनेता प्रियांशू पैन्युली याने मेजर राम मेहता यांच्या उत्कृष्ट भूमिकेने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. “पिप्पा ” मधून एका सैनिकाच्या पेन्युलीच्या आकर्षक चित्रणावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केल्याने चित्रपटाने प्रचंड प्रशंसा मिळवली आहे.
पेन्युलीच्या अभिनयासाठी प्रेक्षक केवळ प्रशंसाच करत नाहीत तर “पिप्पा” मधील त्याच्या नवीन लूकबद्दल देखील ते कौतुक करत आहेत. वेगवेगळ्या भूमिकांसह विविध पात्रांमध्ये अखंडपणे रूपांतरित होण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पेन्युलीने पुन्हा एकदा प्रामाणिकपणे भूमिका साकारण्याची क्षमता दाखवली आहे. मेजर राम मेहता ही भूमिका सुपरहिट ठरत आहे. इंस्टाग्रामवर या अभिनेत्याने चित्रपटातील स्निपेट्स शेयर केले आहेत
यामध्ये मेजर रामसिंग मेहता यांची भूमिका साकारताना आलेल्या आव्हानांची आणि समर्पणाची झलक दिली. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील भूमिकेचे महत्त्व सांगून मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पात्रावर विश्वास ठेवल्याबद्दल पैन्युलीने दिग्दर्शक राज ए मेनन यांचे कौतुक केले.
त्याने आपल्या सहकलाकारांचे आणि संपूर्ण “पिप्पा” कुटुंबाचे आभार मानून, चित्रपटाचे त्याच्या हृदयातील विशेष स्थान अधोरेखित केलं आहे. “यू-टर्न,” “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली,” सारख्या प्रकल्पांसह व्यस्त वर्षात “पिप्पा” हा प्रियांशू पैन्युलीच्या कारकिर्दीतील सर्वात कमालीचा चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक “पिप्पा” मधील त्याच्या कामगिरीच कौतुक करत असताना त्याच्या आगामी प्रोजेक्ट “शेहर लखोत” या वेब सिरीजची सगळेच वाट बघत आहेत.