fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीवर सुरु होत आहे कधी न पाहिलेला असा महासंगम

 

उमाची होणारी तारेवरची कसरत आणि अक्षराच्या मनात होणारी घालमेल तुम्हाला आवडणाऱ्या दोघींच्या विभिन्न विश्वाचा होत आहे सुरेख मेळ प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या झी मराठीवरील दोन मालिका म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. ह्या दोन्ही मालिकांचा कधी न पाहिलेला असा महासंगम येत्या २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अक्षरा आणि उमाची काय असणार नवी कसोटी. भुवनेश्वरीचे  कसे असणार पुढचे डावपेच, कोण देणार आहे तिची साथ. उमाची समजुदारी आणि अनुभव व अक्षराची बुद्धिमत्ता येणाऱ्या आव्हानांना  सामोरी जायला कशी मद्दत करणार हे पाहायला तुम्हाला नक्की मज्जा येईल. निशी व ओवीच जीवन घेणार एक नवीन वळण. एकूणच  काय तर हा मनोरंजनाचा महासंगम उमा आणि अक्षराच्या आयुष्यात खूप काही नवीन वळणे आणणार.

 

आता ह्या ब्लॉकबस्टर महासंगम विशेष भागात नक्की काय होणार ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल. तेव्हा पाहायला विसरू नका मनोरंजनाचा महासंगम २० ते २५ नोव्हेंबर संध्या. ७.३० ते ८.३० फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d