fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मींचा श्री शनी मारुती बालगणेश मंडळातर्फे सन्मान

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री शनी मारुती बालगणेश मंडळाने शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या लक्ष्मींचा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा लक्ष्मीपूजनानिमित्त आज सन्मान करण्यात आला. या उपक्रमाद्वारे मंडळाने समाजासमोर एक नवा पायंडा घालून दिला आहे.

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार व कार्याध्यक्ष दीपक निकम यांनी केले होते.

एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर आरोग्य कोठीमधील लक्ष्मींचा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. डोक्यावर भगवे फेटे, गळ्यात उपरणं, हातात आपुलकीचा फराळाचा बॉक्स, आकाश कंदील देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष दीपक निकम, मंदार बलकवडे, संतोष लांडे, रोहित घाणेकर, दिनेश पेंढारे, गणेश शेलार, संजय घाणेकर, सुनील तेलंग, अनिकेत काळे, राज पेंढारी, एरंडवणे-वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी राजेश गुर्रम, रुपाली मगर, गणेश खिरिड, दिनानाथ मंगेशकर आरोग्यकोठी आरोग्य सेवक घटकांबळे, संतोष थोरात तसेच स्वच्छता दूत उपस्थित होते.  प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सचिन पवार ह्यांनी केले.

Leave a Reply

%d