फडणवीसांनी ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था सांभाळावी, कर्नाटकच्या राजकारणात नाक खुपसु नये.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
मुंबई : महाराष्ट्रात अवैध मार्गाने सत्तेवर आलेल्या व ऊपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी, स्वतःकडे असलेली ‘राज्याच्या कायदा – सुव्यवस्थेची जबाबदारी’ पार पाडावी, कर्नाटकात चोंबडेपणा करून, तेथील सत्तेची फोडाफोडी करण्याचे अनैतिक व बालीश प्रयत्न करू नयेत अशी प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
भाजप देशांत व राज्यात ‘स्वतःच्या कामांवर व कर्तबगारीवर’ निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नसल्याचे पुन्हा – पुन्हा सिध्द होत असुन, भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचे दबावाखाली व ‘निर्विरोघ सत्तेच्या राक्षसी महत्वाकांक्षे पोटी’ राज्यातील भाजप नेते, ॲापरेशन लोटस नांवा खाली, पुन्हा कर्नाटकातील काँग्रेस आमदारांमध्ये फुट पाडण्याचे असंवैधानिक, कुटील, बालीश व निंद्य प्रयत्न दुसऱ्यांदा करत आहे..!
मागील वेळेस देखील फडणवीसांनी ‘मुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाचा’ गैरवापर करून काँग्रेस आमदारांना ‘मुंबईत फाईव्हस्टार हॅाटेल’ मध्ये ठेऊन घेतले होते व कर्नाटकचे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांना भेटु ही दिले नव्हते.
मात्र यंदाच्या निवडणुकीत कर्नाटक जनतेने यावर भाजप’ला सणसणीत चपराक लावुन काँग्रेसला पुन्हा बहुमताने सत्तेत बसविले, तरीही भाजप नेते यातुन बोध घेत नाहीत ही त्यांची शोकांतिका आहे..
कायदा-सुव्यवस्थे प्रश्नी, स्वराज्यास वाऱ्यावर सोडुन, शेजारील कर्नाटकातील राजकारणात चोंबडेपणाने लक्ष घालुन, फोडाफोडीचे कुटील प्रयत्न करून तेथील जनतेचे शाप घेण्याचे काम फडणवीसांनी करू नये..!
‘रयतेच्या राज्याची’ कास धरणाऱ्या शिव छत्रपतींच्या तसेच ‘स्वातंत्र्य व सामाजिक समतेची’ प्रेरणा देणाऱ्या शाहु, फुले, टिळक, आंबेडकरांचे संस्कार लाभलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी, या प्रकारे अनैतिक प्रयत्न करून महाराष्ट्राच्या मातीचे संस्कार व लौकीक धुळीस मिळवु नये… फडणवीसांचे हे ऊद्योग राज्यातील जनतेसमोर ऊघडे पाडणे गरजेचे असल्यामुळेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे ईशारा देण्यात येत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले..!