fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

समाजकल्याण विभागाबरोबर ‘एन.टी. ब’ प्रवर्गामधील सर्व जमातींच्या प्रश्नांबाबत विधानभवनात बैठक घेणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे  : आज पुणे येथे वैदू विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत वैदू समाजाच्या लोकांचा जातीचे दाखले, शिष्यवृत्ती, वसतिगृह यांसह अन्य सुविधांचा लाभ मिळावा आणि समाजाचा सर्वतोपरी विकास व्हावा या संदर्भातील मागण्यांचे निवेदन डॉ. गोऱ्हे यांना दिले.

याशिष्टमंडळात,  विनोद पवार,  गोविंद शिंदे,  बाबासाहेब लोखंडे,  गणेश लोखंडे,  चंद्रकांत लोखंडे,  विठ्ठल जाधव यांचा समावेश होता.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, वसंतराव नाईक महामंडळाच्या अध्यक्षांकडून आत्तापर्यंत भटक्या विमुक्तांसाठी किती निधी वाटप झाला याची माहिती घेण्यात येईल. समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक घेऊन भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला जाईल आणि या समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यात येईल असे सांगितले.

तसेच वैदू समाजाच्या महिला वस्तू विकण्याकरिता विविध गावांत जात असतात यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नोंदणीकृत संस्थेकडून त्यांना आयकार्ड देण्यात यावे. वैदू समाजातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटासोबत शक्ती योजनेद्वारे उपक्रम राबविणार असून समाजाच्या विकासाकरिता पूर्णपणे सहकार्य केले जाणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Leave a Reply

%d