fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

धायरी येथील महिला सफाई कामगारांना भाऊबीज भेट

पुणे : सिंहगडरोड धायरी परिसरातील सफाई कामगार कष्टकरी महिलांना दिवाळी निमित्त धायरी येथील शिवकालीन श्री अंबाईमाता देवस्थानच्या वतीने साडी चोळी ची भाऊबीज भेट देण्यात आली.

देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, देवस्थानच्या वतीने धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात. याशिवाय उपेक्षित वंचित निराधारांना मदत केली जात आहे.सामाजिक बांधिलकीची जोपासणा केली जात आहे.
यावेळी देवस्थानचे सचिव भाऊसाहेब कामठे, चंद्रकांत वांजळे, हिरामण पोकळे, सोपान लायगुडे, बाळासाहेब कामठे, बाजीराव चौधरी,किरण पोकळे,
माजी उपसरपंच संदीप चव्हाण, राहुल पोकळे, जयश्री पोकळे, स्वाती पोकळे,गुलाबराव पोकळे,गंगाधर भडावळे, नामदेव भुरूक, बापुसाहेब पोकळे, भिकाजी कोकाटे, धनंजय पोकळे, नितीन चव्हाण, पद्माकर लायगुडे, उपस्थित होते.

Leave a Reply

%d