Saturday, October 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

जगातील सर्वाच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर समाेर हेलिकाॅप्टरमधून पद्मश्री शीतल महाजन करणार ऐतिहासिक पॅराशूट जंम्प

पुणे : सर्वसामान्य घरातून पुढे येऊन स्कायडायव्हिंग क्षेत्रात वेगवेगळे विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या पुणे शहराची रहिवासी असलेली पदमश्री शीतल महाजन नवीन विक्रम प्रस्थापित करण्यास सज्ज झाली अाहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या सहाकार्याने जगातील सर्वाच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी) समाेर २३ हजार फुट उंचीवरुन हेलिकाॅप्टरमधून एेतिहासिक पॅराशूट जंम्प करणार आहे.
हवामानाच्या परिस्थितीनुसार ७ ते १५ नाेव्हेंबर २०२३ दरम्यान हा विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.  देशाचे दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुरु केलेल्या ‘बेटी की उडान,देश का स्वाभिमान’ (मुलीचे उड्डाण किंवा यश हे राष्ट्राचा अभिमान आहे ) या घाेषणेपासून प्रेरित हाेऊन इतकी माेठी माेहीम करण्याचे धाडस करण्यात येणार आहे.  ही माेहीम केवळ व्यैक्तिक प्रयत्न नसून जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. 


याबाबत शीतल महाजन म्हणाली, यापूर्वी मी २००४ मध्ये उत्तर ध्रूुवावर अाणि २००६ मध्ये दक्षिण ध्रुवावर तर २०१८ मध्ये जगातील सात खंडावर स्कायडायव्हिंग करुन विश्वविक्रम केला अाहे. सन २००७ पासून माऊंट एव्हेरस्टच्या समाेर पॅराशूट उडी मारण्याबाबतचे स्वप्न मी पाहिले हाेते व रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने ते पूर्णत्वास अाता जात अाहे. बर्फाच्छादित माऊंट एव्हरेस्ट येथे स्कायडायव्हिंगसाठी विशेष पॅराशूट उपकरणे अावश्यक अाहे, या सर्वाची सराव चाचणी मागील अाठवडयात अमेरिकेत एॅरिझाेना येथे करण्यात आली आहे. 

माऊंट एव्हरेस्टच्या समाेर २३ हजार फूट उंचीवरुन एएस३५० बी-३या हेलिकाॅप्टर मधून संबंधीत पॅराशूट जॅम्प केली जाणार अाहे. यामध्ये हेलीकाॅप्टर मधून उडी मारल्यानंतर पक्ष्यासारखे अाकाशात विहरत १६ हजार ते १८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले जाणार अाहे. माऊंट एव्हरेस्ट सर करताना तीन महत्वपूर्ण टप्पे समजले जातात. स्यांगबाेचे (१२,४०२ फूट), अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) व कालापत्थर (१७,५०० फूट) याठिकाणी देखील यावेळी पॅराशूट जंप हेलिकाॅप्टर मधून करुन लँडिग केले जाणार अाहे. सदर उंचीवर २६० ते ४०० चाैरस फूटचे माेठे मुख्य पॅराशूट व समान अाकाराचे राखीव पॅराशूट अावश्यक अाहे.या माेहीमेत बर्फाच्छादित शिखर परिसरात पाेटात गाेळा येणारा पॅराशूट जंप अनुभव, नयनरम्य शेर्पा वस्तीचे नेत्रसुखद दृश्य, जगातील सर्वाच्च माऊंट एव्हेरस्टची पार्श्वभूमी, तर तितक्याच उंचीवरील शिखरांसह संपूर्ण डाेंगरदरम्यांचा अनुभव यावेळी अनुभवता येणार अाहे. सागरमाथा या राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन माेहीमेला सुरुवात करण्यात येणार अाहे. युनेस्काे जागतिक वारसा क्षेत्रात स्यांगबाेचे (१२,४०२ फूट) व अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) हे जगातील दाेन्ही सर्वाच्च ड्राॅप झाेन हे. स्कायड्राव्हिंग क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय स्तरावर विक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान यामुळे मला मिळाला आहे. जगात देशाची प्रतिमा उंचवावी यादृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल अाहे. या माेहिमेला रिलायन्स फाऊंडेशनने विशिष्ट सहकार्य केले
अाहे. प्रसिध्द रिलायन्स फाऊंडेशनने पाठबळ दिल्याने हा नवीन विश्वविक्रम मला प्रस्थापित करता येत आहे. .

या माेहीमेत पुढील विक्रम हाेणार

जागतिक विक्रम –

  • जगातील सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन लँडिग करणारी जगातील पहिली महीला
  • जगातील तीन्ही ध्रुवांवर पॅराशूट जंप करणारी जगातील पहिली महिला – उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव व जगातील तिसरा ध्रुव म्हणजे माऊंट एव्हरेस्ट

राष्ट्रीय विक्रम –

  • माऊंट एव्हरेस्ट समाेर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला
  • सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन ध्वज घेऊन उतरणारी भारतीय पहिली महिला
  • सर्वात उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी भारतीय पहिली महिला
  • जगातील तीन ध्रुव म्हणजेच उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव अाणि माऊंट एव्हरेस्ट येथे पॅराशूट जंप करणारी पहिली भारतीय महिला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading