Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी उद्या ब्लॉक

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गाव कि.मी ३७/०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.३० वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी ३.०० वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading