Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोदसिंह गोतारणे

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोदसिंह गोतारणे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते गोतारणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक बापू पवार, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, महिला अध्यक्षा भारती शेवाळे आणि युवक अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी गोतारणे यांचे अभिनंदन केले.

प्रमोदसिंह गोतारणे म्हणाले, “देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनात व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तळागाळातील लोकांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत. सर्वाना सोबत घेऊन विकासासाठी काम करण्याचे पक्षाचे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात काम करणार आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading