पश्चिम हवेलीतील शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप
पुणे: दिवाळी सणाच्या निमित्ताने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने धायरी, खडकवासलासह पश्चिम हवेलीतील सभासद शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप करण्यात आली.
धायरी येथेजेष्ठ किर्तनकार ह.प.भ. चंद्रकांत महाराज वांजळे तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण , साखर कारखान्याचे
संचालक अंकुश उभे आदींच्या हस्ते शेतकऱ्यांना साखर वाटपास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास ३३० शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे काकासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रविण शिंदे ,मिलिंद पोकळे, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले,कारखान्यात जाऊन साखर आणणे या भागातील शेतकऱ्यांना गैरसोयीचे होते.शेतकरी सभासदांना साखर कारखान्याने घरपोच साखर वाटप केल्याने गैरसोय दूर झाली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक उभे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
