Monday, August 31, 2026
Latest NewsSports

एक्सपेन्डेबल्स् इलेव्हन संघाची विजयाची हॅट्ट्रीक; ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबची विजयी सलामी !!



पुणे : जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत एक्सपेन्डेबल्स् इलेव्हन संघाने सलग तिसरा तर, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हरी सावंत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एक्सपेन्डेबल्स् इलेव्हनने व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १०८ धावा धावफलकावर लावल्या. ओंकार एम. याने ३३ धावांची खेळी केली. हरी सावंत याने ६ धावात ४ गडी बाद केले. हे आव्हान एक्सपेन्डेबल्स् इलेव्हनने १५.४ षटकात पूर्ण केले. हरी सावंत याने नाबाद ३५ धावांची, आदित्य जाधव याने ३७ धावांची तर, आदित्य एकशिनगे याने नाबाद २३ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

राज सांबरे याच्या नाबाद ६८ धावांच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने राईझ टू प्ले संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १०८ धावा (ओंकार एम. ३३, गिरीष ओक नाबाद १८, हरी सावंत ४-६, ऋषीकेश वेलणकर २-१०, गणेश कालेल २-२६) पराभूत वि. एक्सपेन्डेबल्स् इलेव्हनः १५.४ षटकात ३ गडी बाद ११३ धावा (हरी सावंत नाबाद ३५, आदित्य जाधव ३७, आदित्य एकशिनगे नाबाद २३, जस्वंत माळी २-३५); सामनावीरः हरी सावंत;

राईझ टू प्लेः २० षटकात ६ गडी बाद १५४ धावा (युवराज झगडे ६० (५०, ७ चौकार, २ षटकार), असीम ज्ञानेश ३१, बंटी रायकर २२, समुद्दीन शेख २-१४) पराभूत वि. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः १८.२ षटकात २ गडी बाद १५६ धावा (राज सांबरे नाबाद ६८ (४३, ५ चौकार, ४ षटकार), उत्कर्ष चौधरी ३९, कृष्णा चौधरी २१); सामनावीरः राज सांबरे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading