ग्रामीण भारतातील गरीबांना आरोग्य साहाय्य करण्यासाठी मेडीबडी आणि सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने केला करार
पुणे – भारतातील सर्वांत मोठा डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म मेडीबडी आणि भारतातील कमी उत्पन्न असणाऱ्यांना वित्तीय सहाय्य करण्यासाठी काम करत असलेली सुक्ष्म वित्त संस्था सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने आज धोरणात्मक भागीदारी करत असल्याची घोषण केली. ग्रामीण भागात दुर्लक्षित राहिलेल्या आणि खास करून महिलांना आरोग्य सेवा पुरविण्यासी ही भागीदारी करण्यात आली आहे. दर्जेदार आरोग्यसेवेपासून जे वंचित राहतात अशा लाखो लोकांना चांगली आरोग्य सेवा पुरवून ही दरी मिटवण्याच्या दृष्टीकोनातून ही भागीदारी करण्यात आली असून हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून सॅटिन क्रेडिटकेअरच्या ग्राहकांना डॉक्टरांचे मार्गदर्शन, मोफत रक्त चाचणी आणि पुरक असा आरोग्य विमा अशा विविध प्रकारच्या आरोरग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. तसेच ते मेडिबडीच्या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतात. त्यांना देशा कुठेही बसून, कोणत्याही वेळी स्पेशिलिस्ट डॉक्टरांना संपर्क करता येऊ शकतो. देशातील दुर्लक्षित लोकांंवर भर देऊन त्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना चांगली आरोग्यसेवा देऊन त्यांना सक्षम करणे हेही या भागीदारीतून साध्य करण्यात येणार आहे.
मेडीबडीचे सहसंस्थापक आणि सीईओ सतिश कन्नन या भागीदारीबद्दल म्हणाले की, अब्जावधी लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट आहे आणि सॅटिन क्रेडिटकेअरशी भागीदारी करणे हा त्यादृष्टीने टाकलेले धोरणात्मक पाऊल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील लोकांना खास करून महिलांना उत्तम आरोग्य सेवा पुरविणार आहोत. मेडीबडी कायमच चांगली आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध आहे आणि सॅटिन क्रेडिटकेअरचे जाळे विस्तारलेले आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना सेवा पुरविण्यात ते तज्ञ आहेत. ज्यांना गरज आहे त्यांन सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत.
सॅटिन क्रेडिटकेअरचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर एचपी सिंग म्हणाले की, आमच्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुवण्यासाठी मेडीबडीशी भागीदारी करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागात कायमच आरोग्यसेवा मर्यादित असतात आणि ही समस्या मिटवणे लगेच मिटवणे गरजेचे असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही एकत्रितरित्या आरोग्यसेवेतील ही दरी दूर करण्यासाठी काम करू शकतो. मेडीबडी डिजिटल हेल्थकेअरमध्ये प्रवीण आहे. त्यांच्या उत्तम सेवेचा आमच्या ग्राहकांना मोठा फायदा होईल.
अब्जावधी भारतीयांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचावी हे मेडीबडीचे उद्दिष्ट आहे आणि ही भागीदारी म्हणजे त्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सॅटिन क्रेडिट केअरच्या विस्ताराचा आणि त्यांच्या क्लायंटपर्यंत पोहचता्ना मेडीबडीला ग्रामीण भागापर्यंत पोहोचता येणार आहे. हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतील २४ लाखांहून अधिक ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.
