Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

२९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात देव आनंद यांच्या स्मृतींना उजाळा

पुणे : ‘फुलों का तारों का…’, ‘अभी ना जाओ छोडकर…’, ‘छोड दो आंचल…’, ‘हैं अपना दिल तो…’, ‘पल भर के लिये कोई हमे प्यार कर लें…’ अशा विविध सुमधुर गाण्यांमधून ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचा स्मृतींना उजाळा देत २९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘एक शाम देव आनंद के नाम’ हा सुपरहिट कार्यक्रम संपन्न झाला. दि. २५ रोजी सायं. श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या संगीतमय कार्यक्रमाने गेली १० दिवस चालू असलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची  सांगता झाली.

‘क्या से क्या हो गया..’, ‘तेरे मेरे सपने..’, ‘पिया तोसे नैना लागे…’, ‘ख्वाब हो या तुम…’, ‘कांटो से खीच के ये आंचल…’, ‘फुलों के रंग से…’, ‘धीरे धीरे चल…’, ‘गाता रहे मेरा दिल…’, ‘होंठों पे ऐसी बात…’ अशा अभिनेते देव आनंद यांच्यावर चित्रित केलेल्या बहारदार गाण्यांनी देव आनंद यांची स्मृती जागवली गेली. यातील अनेक गाण्यांना वन्समोअरही मिळाला.

रफी हबीबसंतोष गायकवाडविनोदनरवडेकविता जवळकर आणि पल्लवी पत्की-ढोले या गायकांनी गायलेल्या सुमधुर गाण्यांना मिहीर भडकमकरअमन सय्यदबाबा खानमुकेश देढिया, सचिन वाघमारेअंकुश बोर्डेरोहित जाधवसोमनाथ फटके आणि संजय हिवराळे यांनी वाद्यसंगत केली.

याचे निवेदन प्रा. महेश अचिंतलवार यांनी केले. सुर पालवी प्रस्तुत हा कार्यक्रम ‘एक शाम देव आंनद के नाम’ पल्लवी पत्की ढोले व संजय हिवराळे यांनी सादर केला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, ट्रस्टचे सचिव घनःश्याम सावंत, गणेश सहकारी बँकेचे चेअरमन व ट्रस्टचे खजिनदार नंदकुमार बानगुडे, सदस्य नंदकुमार कोंढाळकर, गणेश सहकारी बँकेचे संचालक व ट्रस्टचे सदस्य रमेश भंडारी आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक अमित बागुल यांनी कलाकारांचा सत्कार केला.

सलग १० दिवसांचा हा सांस्कृतिक महोत्सव रसिक पुणेकरांमुळे यशस्वी झाला. तसेच या नवरात्रौच्या १० दिवसात ३ लाख हून अधिक भक्तांनी श्रीलक्ष्मीमातेचे दर्शन घेतले असे सांगून आयोजक अध्यक्ष यांनी ‘कभी अलविदा न कहना’ म्हणत सर्वांना दसराच्या शुभेच्छा दिल्या व २९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची सांगता केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading