Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

बजाज अलायन्झ लाइफ  eTouch देत आहे ग्राहकांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी आरोग्य व्यवस्थापन सेवा

पुणे : खाजगी जीवन विमा कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक असलेला  एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक जीवन विमा टर्म प्लॅन बजाज अलायन्झ लाइफ eTouch आरोग्य व्यवस्थापन सेवा (HMS) सादर करत आहे. आपल्या ग्राहकांना सर्वांगीण कल्याणासाठी परिसंस्था प्रदान करण्याच्या कंपनीच्या बांधिलकीचे प्रतिबिंब असलेल्या या सेवांमध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि नेटवर्क सवलत यांसारखे अनेक फायदे आहेत.

हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (आरोग्य व्यवस्थापन सेवा (HMS)) बजाज अलायन्झ लाइफच्या मौल्यवान ग्राहकांना केवळ आर्थिक संरक्षणच नव्हे तर सक्रिय आरोग्य व्यवस्थापन साधनांसह सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. विमाधारक पात्र वैद्यकीय व्यावसायिकांचा दूरवरच्या अंतरावरुनही सल्ला घेऊ शकतात. त्यायोगे ग्राहकांना तत्काळ वैद्यकीय कौशल्याचा लाभ मिळू शकतो. त्यांना औषधे, प्रयोगशाळेत करायच्या चाचणीसाठीचे बुकिंग, बाह्यरुग्ण सल्लासेवा आणि रूग्णालयात दाखल केल्यानंतरचा खर्च यांना लागू असलेल्या नेटवर्क सवलतींच्या श्रेणीचा अॅक्सेस मिळतो. त्यामुळे त्यांचा वार्षिक आरोग्यसेवा खर्च कमी होतो.

बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स आपल्या विमाधारकांच्या पारंपरिक सेवा गरजांच्या पलीकडे कसे जाते यावर बोलताना बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य कामकाज अधिकारी राजेश कृष्णन म्हणाले, “बजाज अलायन्झ लाइफमध्ये, आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी जीवन उद्दिष्टे सक्षम करण्यात अभिमान वाटतो. म्हणून आमचे उत्पादन प्रस्ताव ग्राहकांच्या गरजांनुसार सतत विकसित होत आहेत. नाविन्यपूर्ण जीवन विमा उत्पादने प्रदान करणारी एक जबाबदार आणि अग्रगण्य जीवन विमा कंपनी म्हणून, नवीनतम तंत्रज्ञानाद्वारे सक्षम केलेले साधे आणि अखंड, विना अडथळा सेवा प्लॅटफॉर्म पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बजाज अलायन्झ लाईफ eTouch सोबत आरोग्य व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून देणे हे ग्राहकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आमच्या बांधिलकीचा केवळ एक नैसर्गिक विस्तार होता. या सेवा वैद्यकीय सल्लामसलत सुलभ करण्यात आणि जलद अॅक्सेस मिळवून देण्यात मदत करतात. त्यामुळे आमच्या ग्राहकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकत्रित मिळत त्यांच्या आर्थिक आणि आरोग्य उद्दिष्टांमध्ये मदत होते.  आमच्या ग्राहक प्रथम तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने ग्राहक लाभ घेऊ शकतील अशा सेवांचा एक संच सादर करणे हे आमचे ध्येय आहे.

आरोग्य व्यवस्थापन सेवांची मुख्य वैशिष्ट्ये

  • महिन्याला दोन डॉक्टर इन्स्टा सल्लामसलतसेवा : टेली कन्सलटेशन द्वारे आरोग्यसेवा व्यावसायिकांशी संपर्क साधून वैद्यकीय सेवेचा लाभ घेणे. दूरस्थपणे डॉक्टरांशी सल्लामसलत
  • नेटवर्क सवलत:

–   औषधे (१० % सूट): औषधांवर १०% सूट

–   लॅब टेस्ट बुकिंग (१०% सवलत): लॅब टेस्टवर १०% सूट

–   बाह्यरुग्ण सल्ला (१०% सवलत): बाह्यरुग्ण भेटीवर १०% सूट.

–   इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन (५ % सूट): हॉस्पिटलायझेशनवर ५ % सूट.

सेवेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया https://www.bajajallianzlife.com/ भेट द्या

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading