होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे 2023 CB300R लाँच
नवी दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज ओबीडी२ए नियमानुसार बनवण्यात आलेली २०२३ CB300R लाँच केली. निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टर म्हणून तयार करण्यात आलेली ही मोटरसायकल रोजच्या कंटाळवाण्या प्रवासाचं रुपांतर उत्साहवर्धक राइडमध्ये करेल. ही मोटरसायकल चालवण्यासाठी धमाल आणि जवळ बाळगण्यासाठी आनंददायी आहे. ग्राहकांना २०२३ होंडा CB300R त्यांच्या जवळच्या बिगविंग डीलरशीपकडे नोंदवता येणार असून तिची किंमत रू. २,४०,००० (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे.
होंडाची आधुनिक प्रीमियम बिगविंग मोटरसायकल लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘भारतात ओबीडी२ए इंजिनसह २०२३ CB300R लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. चार खंडांमध्ये कामगिरी आणि वैविध्यपूर्णता यांचा समतोल साधण्याचा वारसा पुढे नेणारी CB300R तरुण रायडर्सना होंडाचे इंजिनियरिंग कौशल्य, डिझाइन आणि दर्जेदार बांधणी यांचा संपूर्ण अनुभव देईल.’
२०२३ CB300R च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘मध्यम वजनाच्या, उच्च कामगिरी करणाऱ्या एचएमएसआयच्या मोटरसायकल्स CB300R च्या लाँचनंतर भारतीय ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनतील. नवी २०२३ CB300R विविध वैशिष्ट्ये आणि जबरदस्त रोड प्रेझेन्स यांमुळे युनिक मूव्ह ठरली आहे. आम्हाला विश्वास आहे, की ही मोटरसायकल नव्या ग्राहकांना आकर्षित करेल आणि त्यांचा रायडिंगचा अनुभव आणखी समृद्ध करेल.’
स्टायलिंग आणि इक्विपमेंट
प्रसिद्ध आणि रेट्रो थीमवर आधारित CB1000R लीटर- क्लास रोडस्टरपासून बनवण्यात आलेली २०२३ CB300R होंडाने रोडस्टर डिझाइनपासून प्रेरणा घेत बनवलेले अत्याधुनिक मशिन आहे. यामध्ये इंधनाची दणकट टाकी आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट देण्यात आले आहे, जे निओ स्पोर्ट्स कॅफे डीएनएवर आधारित आहे. मोटरसायकलच्या एकंदर स्टायलिंगला एलईडी लायटिंग सिस्टीमची (गोलाकार एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प) जोड देण्यात आली आहे.
केवळ १४६ किलो वजन असलेली CB300R ही या विभागातील वजनाने हलकी मोटरसायकल असून तिची हाताळणी चपळ आहे. या मोटरसायकलला ४१ एमएम युएसडी फ्रंट फॉर्क्स आणि मागील बाजूस अडजस्टेबल मोनो- शॉक अबझॉर्बरची जोड देण्यात आली असल्यामुळे भारतीय रस्त्यांसाठी ती अगदी योग्य ठरते. ब्रेकिंगचे काम २९६ एमएम डिस्क ब्रेक (फ्रंट) आणि २२० एमएम डिस्क (रियर) ड्युएल चॅनेल एबीएससह हाताळतात. यात पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इमरजन्सी स्टॉप सिग्नल आणि हझार्ड लाइट स्विच देण्यात आला आहे.
इंजिन आणि कामगिरी
नव्या होंडा CB300R मध्ये दमदार २८६.०१ सीसी, ४ स्ट्रोक, सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी२ए चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन देण्यात आले असून आधीपेक्षा जास्त पर्यावरणपूरक आहे. त्याची मोटर २२.९ केडब्ल्यू उर्जा आणि २७. ५ एनएम टॉर्क देते. रस्त्यावरील वळणांवर ही मोटरसायकल सहजपणे वळवता येते, कारण त्यात ६- स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. त्यामध्ये असिस्ट स्लिपर क्लच देण्यात आला आहे, जो सहजपणे गियरशिफ्ट्स करतो आणि डिअक्सलरेशनच्या वेळेस हार्ड डाउन शिफ्टमधील रियर व्हील लॉक अप प्रभावीपणे हाताळतो. यामुळे रायडरची सुरक्षितता राखली जाते.
रंग, किंमत आणि उपलब्धता
२०२३ होंडा CB300R पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक रंगाच्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्याची किंमत रू… (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. बुकिंग खुले असून ही निओ स्पोर्ट्स कॅफे रोडस्टरची कंपनीच्या प्रीमियम बिगविंग डीलरशीप्सद्वारे विक्री केली जाईल.
| किंमत (एक्स शोरूम दिल्ली) | रू.२,४०,००० |
| रंगाचे पर्याय | पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक |
